Pune Police MCOCA Action | येरवडा परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रथमेश उर्फ गोट्या सुर्यवंशी टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 115 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | पुर्वीच्या वादातून डोक्यात व मानेवर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. तसेच तरुणाच्या मनगटाजवळ चावा घेऊन परिसरात दहशत माजणाऱ्या प्रथमेश उर्फ गोट्या राजेंद्र सुर्यवंशी व त्याच्या एका साथीदारावर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत (Pune Police MCOCA Action) कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 115 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) आयपीसी 307, 325, 323, 506, 34 आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, फौजदारी सुधारणा कायदा कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करुन टोळी प्रमुख प्रथमेश उर्फ गोट्या बाळासाहेब सुर्यवंशी (वय-24 रा. पर्णकुटी पायथा, येरवडा, पुणे), आकाश तायप्पा कानडे (वय-27 रा. शनि आळी, येरवडा, पुणे) यांना अटक केली आहे. हा प्रकार 19 डिसेंबर 2023 रोजी घडला होता.

टोळी प्रमुख प्रथमेश उर्फ गोट्या सुर्यवंशी याने वेगवेगळ्या साथीदारांच्या मदतीने परिसरात खुनाचा प्रयत्न करणे, दंगल माजवणे, गंभीर दुखापत करणे, तडीपार असतानाही हद्दीत प्रवेश करुन टोळीच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगून परिसरात दहशत माजवणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे गंभीर गुन्हे केले आहेत.

येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे,
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 विजयकुमार मगर,
सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे जयदिप गायकवाड, निगराणी पथकाचे
सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, पोलीस अंमलदार सचिन माळी, सचिन शिंदे, देविदास वांढरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे स्थानबद्ध कारवाईचे शतक, आयुक्तांची एका वर्षात ऐतिहासिक कामगिरी

डेटिंग ॲपवरील ओळख पडली महागात, पुण्यातील तरुणीला 27 लाखांचा गंडा

पुणे : जागा विक्रीच्या बहाण्याने महिलेची 1 कोटीची फसवणूक, वकिलासह चार जणांवर FIR; दोघांना अटक

दोन कंपन्यांनी एकाच वितरकाला घातला गंडा ! हाय स्पीड मोटार लावून लो स्पीड ई दुचाकी असल्याचे सांगून केली फसवणूक

Shiv Sena Shinde Group | मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर शिंदे गट आक्रमक, ”छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा”