Pune Police News | आई पासून दुरावलेला 8 वर्षांचा मुलगा सोशल मीडियामुळे दोन तासात आईच्या कुशीत, मुंढवा पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | सोशल मीडियाचा (Social Media) वापर जेवढा चांगला तितकाच वाईट असल्याचे बोलले जाते. मात्र, सोशल मीडिया आणि मुंढवा पोलिसांमुळे (Pune Police News) आई पासून 15 किमी अंतरावर दुरावलेला 8 वर्षाचा मुलगा दोन तासांत त्याच्या आईच्या कुशीत विसावला आहे. मुंढवा ब्रिज (Mundhwa Bridge) परिसरात शुक्रवारी (दि.25) सायंकाळी सहाच्या सुमारास एक 8 वर्षाचा मुलगा एकटाच अनवानी भटकत असून तो रडत असल्याचे रस्त्याने जाणारे चालक अतिश विठ्ठल जगदाळे Atish Vitthal Jagdale (वय-28 रा. वडगाव शेरी) यांना दिसला.

अतिश जगदाळे यांनी मुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुलाला मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) आणून सहायक पोलीस फौजदार होले यांच्या ताब्यात दिले. होले यांनी त्यांचे मदतनीस असलेल्या पोलीस अंमलदार उमा चोरघे यांच्या मदतीने मुलाकडे विचारपूस केली. मात्र, त्याला त्याचा पत्ता, नाव सांगता येत नसल्याने होले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Senior PI Vishnu Tamhane) यांच्याकडे घेऊन गेले.(Pune Police News)

विष्णू ताम्हाणे यांनी मुलाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी बिट मार्शलवरील पोलीस अंमलदार सचिन मेमाणे, संदीप गर्जे यांना मुंढवा चौक, खराडी ब्रिज भागातील लेबर कॅम्प, बिगारी, पथारीवाले, फुगे विक्रेते यांना फोटो दाखवून मुलाची ओळख पटवण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिक, पोलीस, पत्रकार यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मुलाचा फोटो व्हायरल करुन त्याच्या आई-वडिलांच्या शोधाबाबत आवाहन केले.

दरम्यान, हा मुलगा कात्रज चौक (Katraj Chowk) भागातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी त्याच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. मुंढवा पोलिसांनी मुलाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी
यंत्रणेचा योग्य वापर करुन कुटुंबापासून 15 किमी दुरावलेल्या मुलाच्या पालकांचा दोन तासात शोध घेतला. या मुलाचे नाव संजय पवार असून तो अत्यंत गरीब कुटुंबातला असून त्याचे कुटुंबीय फुटपाथवर राहून फुगे व इतर वस्तूंची विक्री करतात. पोलिसांनी मुलाला त्याची आई आशा पवार यांच्या ताब्यात दिले. पालकांनी यावेळी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भोसले (PSI Ashwini Bhosale),
सहायक पोलीस फौजदार होले, पोलीस अंमलदार सचिन मेमाणे, नवनाथ कोकरे, उमा चोरघे, आरती जमाले व
इतर स्टाफने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Subhedar Movie | ‘सुभेदार’ चित्रपटासाठी नागराज मंजुळेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय