Pune Rural Police | पुणे : किरकटवाडीत अफूची शेती, दोघांना अटक; 14 किलो अफूची बोंडे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police | सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) किरकटवाडीत (Kirkatwadi) बेकायदा अफूची (Opium) लागवड केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (Pune LCB) दोघांना अटक केली आहे. पोलिसांच्या पथकाने छापा टाकून 14 किलो अफूची बोंडे जप्त केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.12) करण्यात आली. तानाजी शांताराम हगवणे (वय 48), शिवाजी बबन हगवणे (वय 55, दोघे रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

किरकटवाडीतील नांदोशी रस्त्यावर इंद्रप्रस्थ सोसायटीजवळ आरोपी हगवणे यांची शेती आहे. शेतात अफूची बेकायदा लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक व हवेली पोलीस ठाण्यातील तपास पथकाने छापा टाकला. हगवणे यांनी शेतात अफूची लगावड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी 28 हजार 700 रुपयांची 14 किलो अफूची बोंडे जप्त केली.(Pune Rural Police)

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले
यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक राहुल गावडे, विकास अडागळे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे,
अजित भुजबळ, दत्ता तांबे, दगडू वीरकर, दिलीप आंबेकर, अशोक तारु, गणेश धनवे, संतोष भापकर, रजनीकांत खंडाळे,
सचिन गुंड, मकसुद सय्यद यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास आडागळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात करार ! ‘पुनीत बालन ग्रुप’ करणार खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत

ABVP Vs SFI In Delhi University | दिल्ली विद्यापीठात ‘अभाविप’ने ने ‘एसएफआय’चा पुतळा जाळून केला निषेध