Pune Shivsena On Nikhil Wagle | विधाने मागे घ्या अन्यथा पुणे शहरात फिरु देणार नाही, शिवसेनेचा निखिल वागळेंना इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Shivsena On Nikhil Wagle | भारतरत्न व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांना पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी इशारा दिला आहे. आक्षेपार्ह विधान तात्काळ मागे घ्या अन्यथा शिवसेना पुणे शहरात फिरुन देणार नाही असा इशारा देत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. (Pune Shivsena On Nikhil Wagle )

प्रमोद नाना भानगिरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आपल्या विधानातून विद्वेष पसरवणाऱ्या तसेच प्रत्येक हिंदू नेत्यावर गरड ओकणाऱ्या तथाकथित पत्रकार निखील वागळे यांना पुणे शहर शिवसेनेची शेवटची समज आहे. लोकशाहीची आब राखून विधाने करायला शिका, भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्या बाबत केलेले आक्षेपार्ह विधान तात्काळ मागे घ्या अन्यथा शिवसेना तुम्हाला पुणे शहरात फिरु देणार नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेल्या विधानानंतर ओढवलेल्या नामुष्कीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहेच. त्यामुळे भाजप पुणे शहरने घेतलेल्या भूमिकेचे पुणे शहर शिवसेना पूर्णपणे समर्थन करीत असून निखिल वागळे याने तात्काळ या संबंधी माफी मागावी, असे प्रमोद नाना भानगिरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

भाजपचे नेते सुनिल देवधर (वय ५८, रा. नारायण पेठ) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. २६/२४) दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न
दिल्याबद्दल सोशल मीडियावर संदेश देऊन अभिनंदन केले होते.
त्यावर Twit करताना पत्रकार निखिल वागळे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
त्यामुळे अडवाणी यांना मानणार्‍या असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखावून समाजात एकोपा राहण्यास बाधा निर्माण केली. तसेच सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारी पोस्ट जाणिवपूर्वक प्रसारित करुन त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याकरीता बदनामी करुन अवहेलना केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मौजमजेसाठी मोबाईल व चैन चोरणाऱ्याला हिंजवडी पोलिसांकडून अटक

पुणे : बाललैंगिक कायदा व बलात्कारातील आरोपीची निर्दोष मुक्तता