Pune Sinhagad Road Crime | पुणे : लाईट कट करण्याची भीती दाखवून साडेतीन लाखांचा गंडा; सहा महिन्यांनी गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sinhagad Road Crime | महावितरण कंपनीतून बोलत असल्याचे सांगून वीजबिल (Mahavitaran Bill) भरले नाही म्हणून वीज कट करण्याची भिती घालून सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची 3 लाख 68 हजार रुपयाची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. ही घटना वडगाव बुद्रुक परिसरात घडली आहे. मात्र, सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) सहा महिन्यांनी बुधवारी (दि. 20) गुन्हा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत प्रशांत लक्ष्मण दळवी (वय-49 रा. वडगाव बुद्रुक) यांनी बुधवारी (दि. 20) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 7 सप्टेंबर 2023 रोजी घडला आहे. फिर्यादी यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. महावितरणकडून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे मागील महिन्याचे वीजबिल भरलेले नाही असे खोटे सांगितले. त्यांनतर वीजबिल भरले नाही तर लाईट कट होईल अशी भिती घातली. वीजबिल भरण्यासाठी फिर्यादी यांना वारंवार मेसेज पाठवले.(Pune Sinhagad Road Crime)

वीजबिल भरण्यासाठी फिर्यादी यांना क्विक सपोर्ट नावाचे अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.
अप्लिकेशनचा वापर करून फिर्यादींच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा सायबर गुन्हेगारांनी मिळवला.
त्याद्वारे फिर्यादी यांच्या खासगी माहितीचा वापर करून बँक खात्यातून 3 लाख 68 हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर
करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे क्षीरसागर करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayashree Kawade Suspended | वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडे पुन्हा निलंबित, एसीबीकडून गुन्हा दाखल

Pune Mundhwa Crime | पुणे : ‘मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’, फावड्याच्या दांडक्याने युवकाला बेदम मारहाण