Pune Wanwadi Crime | पुणे : फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Wanwadi Crime | प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीला लग्नाचे खोटे आमिष (Lure Of Marriage) दाखवून शारीरिक संबंध (Physical Relation) प्रस्थापित केले. मात्र, दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करुन तरुणीची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी मुंढवा (Mundhwa) येथे राहणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2016 ते जानेवारी 2024 या कालावधीत घडला आहे. (Pune Wanwadi Crime )

याबाबत घोरपडी गावात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून चेतन चंदर मुट्टल (रा. मुंढवा, पुणे) याच्या विरोधात आयपीसी 376, 376/2/एन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख फेसबुकच्या माध्यमातून 2016 मध्ये झाली. आरोपीने मुलीसोबत फेसबुकवर ओळख करुन तिच्यासोबत चाटिंग सुरु केली.

तरुणीला बोलण्यात गुंतवून प्रेमाच्या ओढले. तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मुलीने आरोपीकडे लग्नाबाबत वारंवार विचारणा केली. मात्र, त्याने टाळाटाळ केली. तसेच गावी जावून दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. याबाबत पीडित तरुणीला समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने शुक्रवारी वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेत वस्ताऱ्याने गळ्यावर वार करुन खून : फरासखाना पोलिसांकडून आरोपीला अटक

Pune Crime Court News | पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

Nikhil Wagle On Pune Police | कालचा हल्ला पुणे पोलिसांच्या संगनमताने, पत्रकार निखिल वागळे यांचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचे आजपासून बेमुदत उपोषण, मराठा बांधवांना केले आवाहन, ”सर्व आमदारांना फोन करा…”

Accident On Samriddhi Highway | समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात; 3 ठार, 2 जखमी

Pune Bharti Vidyapeeth Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक