Pune Yerawada Police | शटर उचकटून चोरी करणारी टोळी येरवडा पोलिसांकडून गजाआड, चार गुन्हे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Yerawada Police | पुणे शहरामध्ये दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या टोळीला येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चार गुन्हे उघडकीस आले आहे. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने व कॉईन, दुचाकी, किराणा सामान असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News)

तौसिफ बशीर शेख (वय-25 रा. कोंढवा), अमोल किसन अवचरे (वय-28 रा. कासेवाडी, भवानी पेठ), आजिम सलिम शेख (वय-24 रा. कासेवाडी, भवानी पेठ), प्रथमेश उर्फ पत्या प्रमोद कांबळे (वय-24 रा. कासेवाडी भवानी पेठ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी शहरातील वेगवगेळ्या पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

येरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी 4 मार्च रोजी हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अमजद शेख, तुषार खराडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांना माहिती मिळाली की, ओंकार सुपर मार्केट व हर्म्स हेरिटेज येरवडा येथे चोरी करणारे संशयीत आरोपी वाडिया बंगला नगर रोड व ब्रह्मासनसिटी वडगाव शेरी येथे थांबले आहेत. त्यानुसार पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत येरवडा पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला. आरोपींची पोलीस कस्टडीमध्ये चौकशी केली असता त्यांनी स्वारगेट, कोंढवा आणि येरवडा परिसरात चार ठिकाणी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून एक लाख 59 हजार 932 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 विजयकुमार मगर,
सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील,
पोलीस निरीक्षक गुन्हे आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील,
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस अंमलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख,
कैलास डुकरे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारात मतदान जनजागृती

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कंटेनरमधून अमेझॉन कंपनीच्या 48 लाखांच्या महागड्या वस्तू लंपास, चालकावर FIR

MIDC Bhosari Accident | पिंपरी : पीएमटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, बस चालकावर FIR