Rahul Gandhi Road Show In Malegaon | राहुल गांधींचं मालेगावात जोरदार स्वागत, मोदी सरकारवर केली टीका, म्हणाले, छोटे उद्योगधंदे संपवले…

मालेगाव : Rahul Gandhi Road Show In Malegaon | बेरोजगारी, महागाई आणि भागीदारी हे भारतात तीन महत्वाचे प्रश्न आहेत. भारताचे धन भागीदारीमध्ये जात आहे. महागाई आणि बेरोजगारीचा आपण सर्व सामना करत आहोत. विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिक्षण घेतात, लाखो रूपये खर्च होतात. पण नोकरी मिळत नाही. कारण छोटे व्यापाऱ्यांचे काम बंद झाले आहे. येथे पावरलूम बंद पडले. छोट्या उद्योगधंद्यांना जीएसटी आणि नोटबंदीने संपवून टाकले, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मालेगावात दाखल झाली. यावेळी मोठी रॅली काढण्यात आली. राहुल गांधी यांनी एका चौकात थांबून भाषण केले. सभेला कार्यकर्ते आणि नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील होते. मी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडायला आलो आहे, असे राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी देशातील जनतेचे लक्ष्य दुसरीकडे वळवत आहेत. कारण त्यांना वाटते हिंदु्स्थानाचे धन १०-१५ लोकांच्या खिशात जावे. भारतात सर्वात श्रीमंत २२ लोक आहेत. त्यांच्याकडे देशातील ७० कोटी जनतेकडे जितका पैसा आहे तितका पैसा आहे. ही हिंदुस्तानची अवस्था आहे.

ते पुढे म्हणाले, मीडिया, विमानतळ, पोर्ट, पावरजनरेशन, सेलफोन जिथे बघाल तिथे हेच २५ लोक दिसतील.
तुम्ही मोबाईल पाहता, रिल्स बघता, पैसे कोण कमावतात? गाडीत पेट्रोल टाकता, पैसे कोण कमवतात? रस्त्यावर चालता,
पैसे कोण कमवतात? विजेचा दर वाढतो, पैसे कोण कमवतात? प्रत्येक ठिकाणी तेच २०-२५ लोक पैसे कमवतात.

राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटले, नरेंद्र मोदी यांनी अदानी सारख्या अब्जाधीशांसाठी काम केले.
या अब्जाधीशांनी मोदींना सांगितले की, तुमचा चेहरा टीव्हीवर हवा, असे वाटत असेल तर जीएसटी, नोटबंदी लागू करा
आणि हिंदुस्तानातील छोट्या व्यावसायिकांना संपवा.

ते पुढे म्हणाले, मोठे उद्योगपती रोजगार देत नाहीत. रोजगार येथे पावरलूममध्ये मिळतो. रोजगार छोटे व्यापारी देतात.
पण त्यांना सर्वांना नरेंद्र मोदी यांनी संपवले आहे. या देशातील तरुणांना रोजगार मिळू शकत नाही, अशी खंत गांधी
यांनी व्यक्त केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rural Police | खुनाच्या गुन्ह्यतील सराईत गुन्हेगाराला पिस्टलसह अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई