Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा केसमध्ये समोर आला शर्लिन चोपडाचा नवीन व्हिडिओ, केला धक्कादायक खुलासा (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  राज कुंद्रा पोर्नोग्राफी (Pornography) केसमध्ये लागोपाठ नवनवीन खुलासे होत आहेत. मुंबई क्राईम ब्रँच (Mumbai Crime Branch) या (Raj Kundra Porn Film Case) प्रकरणाचा तपास करत आहे. याप्रकरणात राज कुंद्रासह 11 लोकांना अटक करण्यात आली आहे. केसमध्ये पूनम पांडे (Poonam Pandey) आणि शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) उघडपणे आपले म्हणणे मांडत आहेत. नुकताच शर्लिन चोपडाने एक नवीन व्हिडिओ (New Video) शेयर केला आहे, ज्यामध्ये अनेक धक्कादायक (Raj Kundra Porn Film Case) खुलासे केले आहेत.

शर्लिन चोपडाने हे सांगून पुन्हा हैराण केले आहे की, या प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलच्या तपास पथकाला जबाब देणारी ती पहिली व्यक्ती होती.
तिने ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

व्हिडिओत शर्लिन म्हणत आहे की, काही दिवसांपासून तिला पत्रकार राज कुंद्राच्या बाबत काही बोलण्यास सांगत आहेत.
तिने सांगितले की, मार्चमध्ये तिनेच संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष जबाब नोंदवला होता.
तिने पुढे म्हटले की, जेव्हा मार्चमध्ये चौकशीची नोटीस मिळाली होती तेव्हा मी देश सोडून पळाली नाही, ना गायब झाले.
या प्रकरणात बोलण्यासारखे खुप आहे परंतु सध्या काही न बोलणे योग्य आहे.

दरम्यान क्राईम ब्रँचच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले जात आहे की, त्यांना उमेश कामतकडून बनवण्यात आलेले सुमारे 70 व्हिडिओ सापडले आहेत.
माहिती देण्यात आली आहे की, हे सर्व व्हिडिओ कामतने वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसच्या मदतीने बनवले होते.

तर सूत्रांनी हे सुद्धा सांगितले की, हॉटशॉट अ‍ॅपवर अपलोड करण्यात आलेले 20 मिनिटांपासून 30 मिनिटापर्यंतचे एकुण 90 व्हिडिओ सुद्धा क्राईम ब्रँचच्या हाती लागले आहेत.
मुंबई क्राईम ब्रँचच्या चौकशीदरम्यान राज कुंद्राला हे व्हिडिओ दाखवण्यात आले जे उमेश कामतने ब्रिटनची प्रॉडक्शन कंपनी केनरिनला पाठवले होते.

रायन थोर्पेने पोलिसांना सांगितले सत्य

कठोर चौकशीदरम्यान राज कुंद्राचा साथीदार आणि आयटी हेड रायन थोर्पे सुद्धा पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने तपास अधिकार्‍यांना सांगितले की, या संपूर्ण रॅकेटमध्ये त्याचा रोल कुंद्रा आणि इतर स्टाफला हे सांगायचा होता.
की, कशाप्रकारे टेक्निकल गोष्टींची काळजी घेऊन ते कायद्यापासून बचाव करू शकतात.
राज कुंद्राचे दोन ऑफिस विआन इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एलजी स्ट्रीमिंगवर छापेमारी करण्यात आली.

Web Title : Raj Kundra Porn Film Case | sherlyn chopra shared new video in raj kundra case says i was first person to give a statement to cyber cell

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Varsha Gaikwad | शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, यंदाही शाळेच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात

Gold Silver Prices Today | सोन्याचे प्रति 10 ग्रॅम दर 46698 रूपये तर चांदीनं खाल्ला भाव, जाणून घ्या

Varsha Gaikwad | शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, यंदाही शाळेच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात