Raj Thackeray On Vasant More | वसंत मोरेंबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरे यांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले… (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Raj Thackeray On Vasant More | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार आणि पूर्वाश्रमीचे मनसे नेते (MNS Leader) वसंत मोरे यांच्याबाबत आज राज ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा राज ठाकरेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी पत्रकाराच्या दिशेने केवळ हात जोडले आणि ते पत्रकार परिषदेतून निघून जाऊ लागले. यानंतर पदाधिकाऱ्यांना बाईट देऊन जा, असे ते म्हणाले. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये हशा पिकला.(Raj Thackeray On Vasant More)

https://www.instagram.com/reel/C5sv9ckpepe/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

आज राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होतो. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? याआधी घेतलेल्या भूमिका आणि आता बदललेली भूमिका यामागे त्यांचा काय दृष्टीकोन होता, यायावर भाष्य केले. मात्र वसंत मोरेंच्या प्रश्नावर बोलणे राज ठाकरे यांनी टाळले.

आपल्या बदललेल्या भूमिकेचे समर्थन करताना शिवसेना ठाकरे गटाचे नाव न घेता राज ठाकरे म्हणाले, २०१४ साली त्यांनी निवडणुकीच्या आधी घेतलेली भूमिका नंतर बदलली होती २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेने भाजपाशी युती तोडली होती. निवडणुकीच्या निकालानंतर काही महिन्यांनी पुन्हा भाजपासह सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता.

राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांबाबत चर्चा केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून, गडकिल्ल्याचे संवर्धन, औद्योगिकीकरणाबाबत महाराष्ट्रालाही प्रकल्प देण्यासंदर्भात चर्चा केली, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांच्याबद्दल बोलणे टाळले, याबाबत वसंत मोरे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले की, मनसे सोडण्यासाठी स्थानिक पदाधिकारी कारणीभूत आहेत. मी आता वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत असलो तरी राज ठाकरे यांनी मला लोकसभेत पाठिंबा द्यावा, अशी विनंती करणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baramati Lok Sabha | शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, प्रतिक्रिया देणे टाळले (Video)

Baramati Lok Sabha | बारामतीकरांचा सवाल, शरद पवारांच्या वक्तव्याने सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू आले, मग अजितदादांचं वक्तव्य का खटकलं नाही?

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी : मुरलीधर मोहोळ

Amol Kolhe | गरोदर महिलांच्या पोषण आहारात अळ्या, राज्यभरात खळबळ! अमोल कोल्हे संतापले, म्हणाले ”पोषण नक्की कोणाचं सुरुय?” (Video)