Raj Thackeray Sabha In Pune | ”मग हा राज ठाकरे आज फतवा काढतो, माझ्या तमाम हिंदु बंधू-भगिनींनो, मुरलीधर मोहोळ तसेच महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करा”, वाचा राज ठाकरे यांचे पूर्ण भाषण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Raj Thackeray Sabha In Pune | देशातील अनेक लोकसभा निवडणुका पाहिल्या, आणीबाणी, पुन्हा इंदिराजींचा विषय आला, नंतर बो फोर्स चा इश्यू होता, नंतर राजीव गांधींचा विषय होता, नंतर बाबरी मश्चिद, दंगली विषयी होता, १९९८ कांदा विषय होता, १९९९ कारगिल विषय झाला, तसेच विदेशी बाईचा मुद्दा झाला, २००४ ला इंडिया शायनिंग आले, २०१४ नरेंद्र मोदींची लाट आली तो विषय होता, २०९९ ला पुलवामा विषय, ही मी पहिली निवडणूक बघतोय, जिला मुद्दाच नाही आणि विषय नसल्याने प्रत्येकजण आयबहिणीवरून बोलतोय, अशी मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्यात बोलताना मांडले.

पुण्यात (Pune Lok Sabha) आज सायंकाळी महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासाठी राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, दीपक मानकर, प्रवीण तरडे, मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, या महाराष्ट्रात अशी भाषा वापरली जाऊ नये. काही नेते तुम्हाला वेगळ्याच विषयात गुंतवूण ठेवायचा प्रयत्न करत आहेत. आज सभा घेतोय, कारण अनेक विद्वान या शहराने दिले, अशा शहरात पुन्हा सत्तेत बसेल अशा पक्षाच्या उमेदवारासाठी मी आलो आहे. मी काही सल्ले मुरलीधर मोहोळ यांना देतोय, नियोजन शून्य मुळे शहरे बरबाद होत आहेत. यासाठी पुण्याच्या विकासाचे नियोजन करा.

काही लोक देश सोडून जात आहेत, वातावरण त्यांना बाहेर ढकलतंय. आमदार, खासदारांचं महत्वाचं काम आपल्या भोवतालचं वातावरण चांगले करणे आहे, मोहोळांनी ते करावे.

राज ठाकरे पुढे म्हणाले, मुंबई शहर बरबाद होण्यास एक काळ गेला. नंतर कस वाढतंय ते समजलं नाही. पुणे शहराची वाट लागायला वेळ नाही लागणार. जर नियोजन नसेल तर ते शहर बरबाद होऊ शकते.

राज ठाकरे म्हणाले, मुंबई पुणे हायवे झाला आणि हे शहर खराब होऊ लागले. ७० लाख पुणे शहराची लोकसंख्या आहे. पाच दहा वर्षापूर्वी ३५ लाख ऐकत होतो. वाहनं ७२ लाख आहेत, कसे रस्ते पुरणार, सार्वजनिक बसेस, मेट्रो झाली. मेट्रो सुरूकरताना पुणेकर जातील का मेट्रोने ते पहा असे म्हणालो होतो. पुणेकरांना टु व्हिलरची सवय आहे.

राज ठाकरे म्हणाले, या शहरात दहा वर्षापूर्वी ३० लाख लोक बाहेरून आले. विविध कारणामुळे आले. अनेक शैक्षणिक संस्था आहेत. आयटी कंपन्या, सरकारी कार्यालये आहेत. ७५ ते ८० हजार कोटी रूपये पुणे कर भरते. शहर मोठं होतंय, वाढतंय.

राज ठाकरे म्हणाले, आमदार, खासदारांना विनंती आहे की या शहरांचे नियोजन झाले नाही तर ही शहरं उद्ध्वस्त होतील. या शहरांकडे लक्ष जाऊ नये, म्हणून काही नेते जातीपातीत तुम्हाला गुंतवून ठेवत आहेत. जातीपातीतून बाहेर पडा, कारण हाताला काही लागणार नाही.

राज ठाकरे म्हणाले, काही वर्षापूर्वी पुणे खुप सुंदर होते. आता त्याची आवस्था बकाल होऊ लागली आहे. म्हणून ते तुम्हाला दुसèया गोष्टींमध्ये गुंतवून ठेवत आहेत.

राज ठाकरे म्हणाले, शरद पवार यांनी राष्ट्रवादीची १९९९ साली स्थापना केली, अजित पवारांबद्दल अनेक मतभेद असतील पण या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, आजपर्यंत ऐकले नाही. शरद पवार साहेबांसोबत राहुन सुद्धा केले नाही, असा टोला राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला.

राज ठाकरे म्हणाले, रामगणेश गडकरींचा पुतळा येथे उखडला, अरे कोण आहेत माहिती आहे का, काहींना वाटले नितीन गडकरींचे नातेवाईक म्हणून उखडला. जेम्स लेनचे प्रकरण आणले, आणि तुमच्यात विष पसरवले.

राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीमुळे काही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये फतवे निघतायंत, काँग्रेसच्या उमेदवारांना मते द्यावीत, उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मत द्या. पण अनेक मुस्लिम सुज्ञ आहेत, त्यांना राजकारण समजते. लोकांना तुम्ही गुरंढोरं समजता का. मग हा राज ठाकरे आज फतवा काढतो, माझ्या तमाम हिंदु बंधू भगिनींना विनंती करतो, मुरलीधर मोहोळ असतील, महायुतीचे उमेदवार असतील त्या सर्वांना भरघोस मतदान करा.

राज ठाकरे म्हणाले, अनेक मुस्लिम चांगले आहेत, पण जे धार्मिक धुमाकुळ घालत आहेत, ते काँग्रेसच्या माध्यमातून डोकं वर काढत आहेत. हे पुन्हा रस्त्यावर फिरणे अवघड करतील. काही वर्षांपूर्वी यांचा उन्माद सुरू होता. बाबरीचा ढाचा पडणे हा त्या उन्मादाचा शेवट होता. हा ढाचा पडल्यानंतर राममंदिर होईल असे वाटले नव्हते, पण नरेंद्र मोदींमुळेच राम मंदिर झाले.

राज ठाकरे यांनी मुरलीधर मोहोळ यांना जवळ बोलावून म्हटले की, मुरलीधर मोहोळ, या पुणे शहरात अनेक लोक येथे राहतात, या पुणे शहराचे नियोजन करा. या पुण्यातील जनतेला सुखाने कसे नांदता येईल, हे चित्र उभे करण्याचे काम तुमच्यावर आहे. खासदार आमदार यांनी मिळून यांनी हे काम करावे. पुणे शहराला चांगले शहर बनवून, माझा सहभाग शंभर टक्के असेल. जसे ते फतवे काढू शकतील, आपण ही काढू शकतो. म्हणून पुणेकरांना विनंती करता मोहोळांसाठी मतदानाचं मोहोळ उठू द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | आढळराव पाटलांनी लांडेवाडीतली वनखात्याची 25 एकर जमीन लाटली; चाकणच्या सभेत डॉ. कोल्हेंनी केला पुराव्यासह गौप्यस्फोट