Rakhi Sawant | राखी सावंतच्या ‘या’ कृत्यामुळे ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार? बिग बॉस ने दिली ‘ही’ शिक्षा

पोलीसनामा ऑनलाइन : Rakhi Sawant | सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व रंजक वळण घेताना दिसत आहे. घरातील वाद – विवाद, नॉमिनेशन, एलिमिनेशन या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना बांधून ठेवत आहे. तर अशातच राखी सावंत हिच्या कृत्याने तर प्रेक्षक डोक्यालाच हात लावून बसले आहेत . काही दिवसांपूर्वीच राखीने घरात एन्ट्री घेतली आणि घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. (Rakhi Sawant)

नुकताच राखी सावंत आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यात जोरात भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. या भांडणात राखी इतकी संतापली कि तीने घरातील भांडी फोडली होती. केवळ एक कॉफी न मिळाल्याने तिने हा संपूर्ण राडा केला होता. मात्र आता तिने केलेल्या या कृत्यामुळे बिग बॉसने तिला शिक्षेस पात्र ठरवले आहे.

राखीच्या या कृत्याने घरातील सदस्यांनी तिच्यावर निषेध नोंदवला होता.
अखेर बिग बॉस ने घरातल्या सदस्यांच्या निषेदाची दखल घेत राखी शिक्षेस पात्र आहे असे म्हणत तिला पुढच्या आठवड्याच्या घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट करण्यात आले. त्यामुळे आता राखी डेंजर झोन मध्ये आली आहे.त्यामुळे आता येणाऱ्या पुढील आठवड्यात राखी घराबाहेर जाणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title :- Rakhi Sawant | rakhi sawant broke property of big boss house

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shreyas Iyer | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रेयसचा बोलबाला; सूर्यकुमारलाही टाकले मागे

Pune Crime | ‘माझ्यासोबत रिलेशन ठेव अन्यथा…’ भर रस्त्यात धमकी देत तरुणीचा विनयभंग; पुण्यातील घटना