Ramdas Tadas | भाजपा खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, छोट्या मुलासह पत्रकार परिषदेत मांडली व्यथा, मोदींकडे मागितली भेटीची वेळ

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – Ramdas Tadas वर्धा लोकसभा मतदार संघाचे (Wardha Lok Sabha Election 2024) भाजपाचे खासदार आणि सध्याचे उमेदवार रामदास तडस यांची सूनबाई पूजा तडस (Pooja Tadas) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सासरे रामदास तडस आणि पती पंकज तडस (Pankaj Tadas) यांच्यावर मारहाणीचे आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले. तडस कुटुंबियांनी मला लोखंडी रॉडने मारहाण केली. बाळाचा बाप कोण आहे? असे प्रश्न विचारुन माझी बदनामी केली, बाळाची डीएनए टेस्ट (DNA Test) करायला सांगितले आहे, अशी खळबळजनक व्यथा पूजा यांनी मांडली यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) त्यांच्यासोबत होत्या.(Ramdas Tadas)

लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात त्यांच्या सूनबाई पूजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केल्याने रामदास तडस अडचणीत आले आहेत.

पूजा तडस म्हणाल्या, तडस कुटुंबियांनी मला लोखंडी रॉडने मारहाण केली. बाळाचा बाप कोण आहे? असे विचारुन माझी बदनामी केली. बाळाची डीएनए टेस्ट करायला सांगितली. खासदारांनी त्यांच्या मुलाला बेदखल केले म्हणतात पण प्रत्यक्षात मुलाला घरात ठेवले आहे आणि मला बाहेर काढले आहे.

पूजा म्हणाल्या, मला दोन वेळच्या जेवणाची सोय नाही की बाळाला दूध पाजण्यासाठी पैसे नाहीत.
जर लोकप्रतिनिधी सुनेला न्याय देऊ शकत नाही नसतील तर समाजाला काय न्याय देतील?
त्यामुळे मी वध्र्याच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे.

या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सुषमा अंधारे म्हणाल्या, पंतप्रधान मोदी देशाला आपले कुटुंब मानतात
आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या खासदाराच्या सुनेवर अत्याचार होतो, हे अतिशय गंभीर आहे.
मोदींनी पूजाला न्याय द्यावा.

दरम्यान, पूजा तडस यांचे पती पंकज तडस यांनी पूजा यांच्यावर आरोपावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, हा हनीट्रॅपचा
प्रकार आहे. खंडणी मागितल्याच्या दोन हजार क्लिप माझ्याकडे आहेत.
यात सहा प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, त्यामुळे मी फारकाही बोलू शकणार नाही.
विरोधकांना हाताशी धरुन तमाशा करण्याचा प्रकार आहे. ज्या मुलीला संसार करायचा असतो ती असा तमाशा करत नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : आयपीएल तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : बॅनर फाडल्याच्या जाब विचारुन तरुणाच्या डोक्यात घातला दगड, 6 जणांवर गुन्हा; एकाला अटक