Ranjangaon Ganpati Pune Crime News | ‘ज्वेलर्स’च्या दुकानाचे शटर उचकटून 16 लाख 25 हजारांचे दागिने चोरीला; रांजणगाव गणपती येथील घटना

शिक्रापूर : (सचिन धुमाळ) – Ranjangaon Ganpati Pune Crime News | शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) रांजणगाव गणपती येथील ‘अथर्व ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १६ लाख २५ हजारांचचा सोने व चांदीचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे (Ranjangaon MIDC Police Station) पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे (PI Mahadev Waghmode) यांनी दिली.

याबाबत रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि १२) रोजी पहाटेच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला असुन श्रीहरी निवृत्ती खोल्लम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १२ जुन रोजी सकाळी ६ वाजता दुकानाच्या वरील मजल्यावर राहणाऱ्या हर्षल प्रविण पाटील यांनी तुमच्या दुकानाचे लोखंडी ग्रील व शटर तुटले असुन चोरी झाली असल्याचा संशय व्यक्त केल्याने दुकानावरती जाऊन पाहिले असता दुकानात चोरी झाल्याचे दिसुन आले.(Ranjangaon Ganpati Pune Crime News)

याबाबत तातडीने पोलीसांना कळवताच शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे,
सहायक पोलिस निरीक्षक बजरंग झेंडे, पोलिस उपनिरीक्षक निळंकंठ तिडके, पोलिस हवालदार संतोष औटी यांनी
घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली . याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारे
हे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anil Deshmukh On Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘मृत तरुण-तरुणी दारु पिऊन गाडी चालवत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न’ माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

Bibvewadi Gangadham Chowk Pune News | गंगाधाम चौक परिसरातील रस्ते भविष्यात होणार मृत्यूचे जाळे? वाढत्या जड वाहतुकीमुळे तीव्र उतारावर वाहनचालकांचा जीव मुठीत घेउन प्रवास (Videos)