Rashmika Mandanna | अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच अडकणार का लग्नबंधनात? व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवलेली जोडी म्हणजे अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या अफेअरस् च्या चर्चा तर अनेक महिन्यांपासून चालू आहेत. मात्र आता ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे. याचे कारण म्हणजे या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन त्यांची लगीनघाई सुरु आहे असा त्यांच्या चाहत्यांचा अंदाज आहे. (Actress Rashmika Mandanna)

या व्हिडिओमध्ये विजय आणि रश्मिका लंच डेटला गेलेले दिसत आहेत. तसेच त्यांच्यासोबत दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मंडळीदेखील उपस्थित असल्याचे दिसत आहे.

रश्मिका आणि विजय (Vijay and Rashmika) या जोडीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या ऑन स्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. विजय आणि रश्मिकाने गीता गोविंदम् (Geeta Govindam) आणि डियर कॉमरेड (Dear Comrade) या चित्रपटात एकत्र काम केले होते. तेव्हापासून ही जोडी चर्चेत असून ते एकमेकांच्या प्रेमात असल्याचे बोलले जात आहे.

या आधी त्यांनी त्यांच्या एका व्हिडीओ आणि कमेंटवरुनही याच चर्चा सुरु झाल्या होत्या. रश्मिकाने तिच्या वाढदिवसाला एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओचा स्क्रिनशॉर्ट आणि विजयचा एक फोटो एका नेटकऱ्याने जोडून ट्विटरवर ट्वीट केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिले की, ‘विजय आणि रश्मिका हे एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघे एकाच घरात राहात आहेत.’ नेटकऱ्याच्या या पोस्टला रश्मिकाने रिप्लाय दिला होता की,”अय्यो… जास्त विचार नको करू बाबू”. रश्मिकाच्या या रिप्लायनं सर्वांच लक्ष वेधलं होतं.

सध्या अभिनेत्री रश्मिका (Actress Rashmika Mandanna) आणि अभिनेता विजय हे दोघेही यशाच्या
शिखरावर आहेत. विजय देवरकोंडा आपल्या लायगर (Liger) या चित्रपटातून तर रश्मिकाने गुडबाय (Goodbye)
या चित्रपटांमधून बॉलीवुडमध्ये दमदार पदार्पण केले. विजय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत
(Samantha Ruth Prabhu) ‘कुशी’ (Kushi) या चित्रपटात झळकणार असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच गौतम तिन्नुरी (Gautama Tinnuri) आणि परशुरामच्या (Parasuram) आगामी सिनेमातदेखील तो काम करणार आहे. रश्मिकाकडेही अनेक मोठे आगामी प्रोजेक्टचे काम आहे. तिचा लवकरच ‘अ‍ॅनिमल’ (Animal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच ती पुष्पा 2 (Pushpa 2) सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्थ आहे.

Web Title :  Rashmika Mandanna | vijay deverakonda rashmika mandanna wedding update vijay deverakonda rashmika mandanna planning wedding spotted lunch with family friends video viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globall