Ratnagiri Accident News | रस्त्यावरून चालताना दुचाकीने दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बोर्ली (Dighi Borli) या ठिकाणी एक विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये दिघी बोर्ली रस्त्यावरील श्रीवर्धन वेळास आणि वडवली गावाच्या मध्ये असलेल्या भल्ला पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. रात्री 9 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
वडवली गावातील रहिवासी आतिश महेश नाकती Atish Mahesh Nakati (वय वर्ष 30) हे आपली होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH 06 BR 8998 घेऊन वेळासवरून बोर्लीच्या दिशेने येत होते. यावेळी इग्बाल शरफुद्दिन गझगे Igbal Sharafuddin Ghazge (वय वर्ष 55) राहणार गोंडघर हे बोर्लीच्या दिशेने पायी चालत येत होते. यावेळी ते भल्ला पेट्रोल पंपासमोर आले असताना त्यांना आतिश नाकती याच्या मोटरसायकलने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती कि आतिश महेश नाकती आणि इग्बाल शरफुद्दिन गझगे हे दोघेही जखमी होऊन खाली पडले. इक्बाल शरफुद्दिन यांच्या डोक्याला जबर मार लागला होता तर आतिश नाकती हेदेखील डोक्याला गंभीर मार लागल्याने जखमी झाले होते.

या अपघाताची माहिती मिळताच दिघी सागरी बोर्ली पंचायतन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.प्रसाद ढेबे
(Dighi Sagari Borli Panchatan Police Station Assistant Police Inspector Dr. Prasad Dhebe) हे आपल्या टीमसह
घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने बोर्ली पंचायतन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
मात्र आतिश महेश नाकती यांचा उपचारापूर्वीच दुर्दैवाने मृत्यू झाला.
तर दुसरीकडे इक्बाल शरफुद्दिन गझगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात
आले मात्र त्यांनीदेखील अर्ध्या वाटेतच आपले प्राण सोडले.
या घटनेमुळे वडवली व गोंडघर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बोर्ली पंचायतन पोलीस (Borli Panchayatan Police) या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :- Ratnagiri Accident News | two youth died in bike accident in raigad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

New Gold Hallmark | सोने खरेदी-विक्रीच्या नियमात आजपासून होणार बदल; नवीन हॉलमार्क होणार लागू

Buldhana Crime News | 26 वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू; बुलढाणामधील घटना

Pune Crime News | कोंढवा : पैसे न दिल्याने पत्नीने पतीच्या पोटात खुपसला चाकू