S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी, न्युट्रीलिशियस् संघांचा सलग दुसरा विजय !!

पुणे :S. Balan Cup T20 League |पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ (S. Balan Cup T20 League) अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी (Hemant Patil Cricket Academy) आणि न्युट्रीलिशियस् संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. (S. Balan Cup T20 League)

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर (Shinde High School Ground, Sahakarnagar) सुरू असलेल्या या स्पर्धेत ऋतुराज धुलगूडे याच्या कामगिरीमुळे हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबचा ८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १५० धावा धावफलकावर लावल्या. श्रेयस मिटकरी (२८ धावा), रोहीत करंजकर (२७ धावा), स्वप्निल फुलपगार (२५ धावा) आणि ऋतुराज धुलगूडे (१६ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबची मजल १४२ धावांपर्यंत गेली. राज सामब्रे (२० धावा), क्षितीज कबिर (२१ धावा) आणि नीरज मोरे (२० धावा) यांनी विजयासाठी शर्थ केली पण विजय ८ धावांनी दूर राहीला. हेमंत पाटील संघाच्या कृष्णा पाटील आणि ऋतुराज धुलगूडे चमकदार गोलंदाजी केली.

आदित्य लोंढे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्युट्रीलिशियस् संघाने इव्हॅनो इलेव्हन संघाचा ४ गडी राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना इव्हॅनो इलेव्हनने १३८ धावांचे आव्हान उभे केले. राकेश मते (३७ धावा) आणि शिवराज शिंदे (३८ धावा)
यांनी संघाचा डाव सावरला. हे आव्हान न्युट्रीलिशियस् संघाने १७.४ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. शंतनु खेनट (४० धावा),
योगेश ताकवले (२० धावा) आणि आदित्य लोंढे (१८ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला. (S. Balan Cup T20 League)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद १५० धावा (श्रेयस मिटकरी २८, रोहीत करंजकर २७, स्वप्निल फुलपगार २५,
ऋतुराज धुलगूडे १६, अजय पाटील २-१८) वि.वि. ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ८ गडी बाद १४२ धावा
(राज सामब्रे २०, क्षितीज कबिर २१, नीरज मोरे २०, कृष्णा पाटील २-२४, ऋतुराज धुलगूडे १-२९); सामनावीरः ऋतुराज धुलगूडे;

इव्हॅनो इलेव्हनः २० षटकात ८ गडी बाद १३८ धावा (राकेश मते ३७, शिवराज शिंदे ३८, जय २२, आदित्य दावरे २-१५, अक्षय चव्हाण २-११)
पराभूत वि. न्युट्रीलिशियस्ः १७.४ षटकात ६ गडी बाद १४२ धावा (शंतनु खेनट ४०, योगेश ताकवले २०, आदित्य लोंढे १८,
शिवराज शिंदे २-१७); सामनावीरः अजय लोंढे;

Web Title :-   S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak’ Championship T20 Cricket Tournament; Hemant Patil Cricket Academy, Nutrilicious teams second win in a row !!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | भाजप नेते गणेश बिडकर यांच्याकडे 25 लाखाच्या खंडणीची मागणी, जाणून घ्या प्रकरण

Ready Reckoner Rate | 2023-24 मध्ये रेडिरेकनरमध्ये कोणतीही दर वाढ नाही? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | रोहित माझ्या मुलासारखा, मी असं का करु?, अजित पवारांची स्पष्टोक्ती

Chandrashekhar Bawankule | पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार?, बावनकुळे म्हणाले -‘आमची त्यांना विनंती आहे की…’