5G ला विसरून जा ! Samsung आणतंय 6G, मिळेल 5 जीच्या तुलनेत 50 पट जास्त वेग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 4G आणि 5G टेक्नॉलॉजीनंतर आता अनेक देश 6G टेक्नॉलॉजी आणण्याची तयारी करत आहेत. या दरम्यान आता दक्षिण कोरियाची टेक्नॉलॉजी कंपनी सॅमसंग (Samsung) ने नुकताच दावा केला आहे की त्यांनी 5G च्या तुलनेत 6G रिसर्चमध्ये 50 पट जास्त वेग मिळवला आहे. samsung claimed to have achieved 50 times faster speed in 6g research compared to 5g

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, प्रॉडक्ट स्ट्रॅटेजीचे हेड, नेटवर्क बिझनेस, वोनिल रोह यांनी नवीन 5 जी ट्रान्समिशन उपकरणावरील प्रेझंटेशन दरम्यान म्हटले की, कंपनीने 5 जी नेटवर्कवर 5.23 गीगाबाईट प्रति सेकंद (Gbps) ची गती प्राप्त केली आहे.

संधीच्या जगताची निर्मिती
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स नेटवर्क बिझनेस SVP, प्रगत संवाद संशोधनाचे प्रमुख, सुंगयुन चोई यांनी संगितले – ‘6 जी विविध नव्या टेक्नॉलॉजीसह संधीच्या एका जगताची निर्मिती करेल. ज्यामुळे नवीन अनुभव आणि सेवांचे मॉडेललापूर्ण आकार मिळेल. आम्ही 6 जीला प्रत्यक्षरूप देण्यासाठी उत्साहित आहोत.

Pune City Police | शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदाराना आज पदोन्नती

5 जीच्या तुलनेत 6जी असेल 50 पट वेगवान
खरं तर आम्ही अगोदरच टेरा हर्ट्ज संप्रेशषणाचे सादरीकरण केले आहे.
जे 6 जीशी संबधींत आमची प्रगती दर्शवते. प्रेझंटेशन स्लाईडमध्ये सांगितले आहे की,
या 6 जी टेक्नॉलॉजीचा वेग 5 जीच्या तुलनेत 50 पट जास्त आहे.

कमर्शलायजेशन 2028 पर्यंत
कंपनीच्या एका श्वेतपत्रानुसार, सॅमसंगला आशा आहे की, 6 जी स्टँडर्डचे पूर्ण होणे आणि त्याचे लवकरात लवकर कमर्शलायजेशन 2028 पर्यंत होऊ शकते.
तर मोठ्या प्रमाणात कमर्शलायजेशन 2030 च्या जवळपास होऊ शकते.

6 जी टेक्नॉलॉजीने या सेक्टरला होईल मदत
चोई यांनी म्हटले कंपनी फ्यूचर टेक्नॉलॉजीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स,
व्हिज्युअल टेक्नॉलॉजी आणि सिक्युरिटीच्या नवीन क्षेत्रांचा सतत शोध घेत आहे.
चोई यांच्यानुसार, XR- एक नवा शब्द जो ऑगमेंटेड रियलिटी, व्हर्च्युअल रियलिटी आणि मिक्स्ड रियलिटीला जोडतो,
जो मनोरंजन, वैद्यकीय, विज्ञान, शिक्षण आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीच्या सीमा वाढवतो.

LIC : दररोज 200 रुपये भरा अन् 28 लाख मिळवा, जाणून घ्या

बहुतांश सिस्टमचे व्हर्च्युअलायजेशन
माहितीनुसार, कंपनीने आपले नेटवर्क ऑपरेशन्स सोपे करण्यासाठी आपल्या बहुतांश सिस्टमचे व्हर्च्युअलायजेशन केले आहे.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स नेटवर्क बिझनेस ईव्हीपी, ग्लोबल सेल्स अँड मार्केटिंगचे हेड वाजून किम यांनी म्हटले,
भारतात आम्ही जगातील सर्वात मोठ्या सिंगल व्हर्च्युअल कोअर नेटवर्कचे संचालन करतो, ज्याची क्षमता करोडो ग्राहकांना सपोर्ट करण्याची आहे.

Web Titel : samsung claimed to have achieved 50 times faster speed in 6g research compared to 5g

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder News | चाकूने सपासप वार करत भरबाजारातच पतीने पत्नीचा केला खून, जळगाव जिल्ह्यातील घटना