Sanjay Raut | ‘याचा हिशोब 2024 मध्ये केला जाईल’; संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – आयएनएस विक्रांत निधीत भ्रष्टाचार झाला होता. याप्रकरणी भाजप खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर आरोप होते. पण, आता न्यायालयाने किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना दोषमुक्त केले आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना क्लीन चीट दिली. किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत, अशी कबुली मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य करत सोमय्यांना इशारा दिला आहे. 2024 मध्ये याचा हिशोब केला जाईल, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावर पुढे बोलताना (Sanjay Raut) राऊत म्हणाले, सरकार बदल्यानंतर ज्या काही गोष्टी अपेक्षित असतात, ही त्यातील एक गोष्ट आहे. याचा अर्थ तो विषय संपला असा होत नाही. आयएनएससाठी पैसे गोळा झाल्याचे सर्वांना माहीत आहे. मग तो रुपाया असेल किंवा 50 कोटी. पैशांचा अपहार झालाच आहे. पैसे राजभवनात गेले असे म्हणतात आणि राजभवन सांगते आहे, आमच्याकडे पैसे आले नाहीत. हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पुरावा आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न विचारायला हवा. आमच्या लोकांना क्लीन चीट मिळणार नाही. हा ईडीच्या अख्त्यारीतला विषय आहे. राष्ट्रीय सुरक्षेसोबत झालेला हा खेळखंडोबा आहे. आज जरी सोमय्यांना दोषमुक्त केले असले, तरी 2024 ला हे प्रकरण नव्याने समोर येईल. कोणतेही सरकार कायमस्वरुपी नसते. सरकार बदलेल आणि सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल.

महाविकास आघाडी येत्या 17 डिसेंबर रोजी विविध कारणांसाठी मुंबईत मोर्चा काढणार आहे.
त्यासाठी आघाडीला अद्याप राज्य शासनाची परवानगी मिळालेली नाही. त्यावर देखील राऊतांनी भाष्य केले.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या महापुरुषांचा आणि आमच्यासाठी
दैवत असलेल्या महामानवांचा अपमान घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती खुलेआम करते.
आणि दुर्दैव म्हणजे त्यांचे समर्थन सरकार करते. या विरोधात आमचा मोर्चा आहे.
त्यामुळे आम्ही तो मोर्चा काढू नये का? आम्ही मोर्चा काढू नये, असे जर सरकारला वाटत असेल,
तर त्यांनी राज्यपालांना पदावरून हटवले पाहिजे.
शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यावर कारवाई झाली पाहिजे.
त्यांनी ती केली नाही. त्यामुळे त्यांच्या निषेधार्थ आमचा मोर्चा आहे, असे राऊत म्हणाले.

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on bjp kirit somaiya gets clean chit from mumbai police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | अपघात झाल्याचे सांगून लुटणारी टोळी दत्तवाडी पोलिसांकडून गजाआड, 4 गुन्हे उघडकीस

Rakhi Sawant | राखी सावंतच्या ‘या’ कृत्यामुळे ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार? बिग बॉस ने दिली ‘ही’ शिक्षा