Sanjay Raut | आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रकर्षाने आठवण होते – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चैत्यभूमीवर आले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आणि माध्यामांशी संवाद साधला. देशातील प्रत्येक क्षेत्रात आज घटनेची पायमल्ली सुरू आहे. न्यायव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, राजकारण प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान होताना दिसत आहे. म्हणून आज आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रकर्षाने आठवण होत आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे दोघे या महाराष्ट्राची दैवते आहेत. ते आमच्या मनात आणि रक्तात आहेत. आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जो महासागर उसळला आहे, त्यातील आम्ही एक आहोत. आम्हाला डॉ. आंबेडकरांचे स्मरण फक्त आजच होत आहे असे नाही. जेव्हा जेव्हा या देशात कायदा आणि घटनेची पायमल्ली होते, सामान्यांवर अत्याचार होतात, तेव्हा तेव्हा आम्हाला बाबासाहेबांची घटना आणि त्यांचे कार्य सतत आठवत राहते, असे यावेळी राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

आज महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरेंचा हात धरून आले होते. प्रबोधनकारांच्या सांगण्यावरूनच ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
म्हणून आम्हाला आज त्यांचे स्मरण होत आहे. मुंबईत मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबईवर हल्ले सुरू आहेत. ‘मुंबईवर हल्ले सुरू राहिले, तर मुंबई मराठी माणसाच्या हातात राहणार नाही.मुंबईवर
मराठी माणसाचा नैसर्गिक हक्क आहे,’ असे डॉ. आंबेडकर म्हणाले होते.
त्यामुळे आज त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, असे यावेळी राऊतांनी नमूद केले.

Web Title :- Sanjay Raut | shivsena sanjay raut on dr babasaheb ambedkar mahaparinirvan din bjp centel government uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Karnataka Seemawad | बेळगावातील दगडफेकीचे पडसाद पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये

Devendra Fadnavis | “ज्यांना कोकणाने भरभरून दिलं त्यांनीच अन्याय केला”; रिफायनरी होणारच, देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका