Santosh Juvekar | संतोष जुवेकरचा नव्या हिंदी चित्रपटाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला…
पोलीसनामा ऑनलाइन : गेल्याच महिन्यात ’36 गुण’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेला मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. त्याने याआधी ‘मोरया’, ‘झेंडा’, ‘पोलीस लाईन’, ‘एक तारा’ या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आला होता. त्याने त्याच्या अभिनयातून स्वतःची एक छाप चाहत्यांच्या मनात निर्माण केली आहे. तर आता नुकतीच त्याने आपल्या नव्या हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे. ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Santosh Juvekar).
संतोष जुवेकरने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी देत त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट शेअर केली. त्याने त्याचा आगामी चित्रपट कुत्ते याचे एक पोस्टर शेअर करत म्हणाला, “मित्रांनो 13 जानेवारीला एक अजून धमाका कुत्ते, खूप स्वप्न आहेत त्यातील एक अजून स्वप्न सत्यात उतरलं, यामध्ये त्यांनी चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली याबाबतचा खुलासाही केला आहे”.
तर या चित्रपटात संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सोबत अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह,
कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज अश्या बड्या कलाकार मंडळींचा समावेश आहे.
तर हा चित्रपट थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाज
यांनी केले आहे. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे.
तर हा चित्रपट 13 जानेवारी 2023 दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाला संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले, तर गुलजार यांनी यातील गाणे लिहिले आहे.
Web Title :- Santosh Juvekar | marathi actor sanotsh juvekar shared promo of his upcoming hindi film kutte
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Retinal Age Gap | डोळ्यांच्या रेटिनाद्वारे समजू शकते किती आयुष्य आहे तुमचे – स्टडी