Shaina NC In Pune | येत्या काळातही महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी यासाठी आम्ही भूमिका मांडू ! पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या प्रश्‍नांवर संवेदनशील – शायना एन.सी.

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shaina NC In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या प्रश्‍नांवर संवेदनशील आहेत. त्यामुळेच महिलांसाठी अनेक योजना आणल्या असून त्या सक्षम होत आहेत. राजकारणातही महिलांना समान संधी देण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत. येत्या काळात महाराष्ट्रातही पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी, ही भूमिका आम्ही वरिष्ठांकडे मांडू, असे मत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी आज येथे व्यक्त केले.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha) भाजप महायुतीचे (Mahayuti BJP Candidate) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि बारामतीच्या उमेदवार (Baramati Lok Sabha) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी येथे आलेल्या शायना एन.सी. यांनी पत्रकार परिषदेत संबोधीत केले. याप्रसंगी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, रिपाइं आणि जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.(Shaina NC In Pune)

शायना एन.सी. म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महिलांच्या विषयावर संवेदनशील आहेत. महिलांच्या विषयावर बोलत आहेत. मागील दहा वर्षात महिलांचा शिक्षणाचा टक्का वाढला. महिला राफेल युद्ध विमाने चालवू लागल्या. चांद्रयान मोहीमेत सहभागी होउ लागल्या आहेत. लखपती दीदी योजना आणि जनधन योजनेत सर्वाधिक महिलांची खाती आहेत. महाराष्ट्रात विशेतष: पुणे मुंबईत स्टार्टअपच्या माध्यमातून २० हजारांहून अधिक महिला आर्थीक सक्षम झाल्या आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ च्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण सुरु आहे. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचा उज्वला गॅस योजनेमुळे चुलीच्या धूरापासून होणारा त्रास थांबला आहे. ट्रीपल तलाकच्या माध्यमातून मुस्लिम कुटुंबातील महिलांचे जीवन सुसह्य झाले आहे.

राजकारणातही महिलांना समान संधी मिळावी यासाठी बिल मंजूर केले आहे.
अधिकाअधिक महिला राजकारणात याव्यात यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.
महाराष्ट्रामध्ये आगामी काळात मुख्यमंत्रीपदी महिलेला संधी मिळेल का?
याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या मुख्यमंत्रीपदी महिलेला संधी मिळाली पाहीजे,
यासाठी आम्ही आमच्या नेत्यांकडे भुमिका मांडू असे स्पष्ट करतानाच लोकसभा निवडणुकीत आपल्याच पक्षाने ५० टक्के
महिलांना उमेदवारी का दिली नाही? याबाबत उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले.

अजित पवार यांनी मोठ्याप्रमाणावर विकासकामे केली आहेत. सुनेत्रा पवार देखिल शैक्षणिक, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात बरोबरीने काम करत आल्या आहेत.
त्यांनी बारामती येथे टेक्सटाईल्स मिलच्या माध्यमातून १५ हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
या देशाने इटली ची सून मान्य केली, तर बारामतीची सून का नाही.
सुनेत्रा पवार आणि मुरलीधर मोहोळ यांना मोठ्या प्रमाणावर मतदान करून विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा.

  • शायना एन.सी., भाजप प्रवक्ता.

माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू कर्नाटकचे खासदार प्रज्वल यांची लैगिंक अत्याचाराची प्रकरणे उघडकीस
आली आहेत. भाजपची देवेगौडा यांच्या पक्षासोबत युती आहे, याकडे लक्ष वेधले असता शायना एन.सी. यांनी
खासदार प्रज्वल यांच्या कृत्याचा निषेध केला. तसेच देवेगौडा यांच्या पक्षांने त्यांना निलंबीत केले असून याप्रकरणी योग्य
तपास करण्याचे आदेशही पोलिसांना दिल्याचे शायना एन.सी. यांनी नमूद केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”