Shirur Lok Sabha Election 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shirur Lok Sabha Election 2024 | भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करुन घेण्यात आले असून मतदार जागृती रॅली आणि गृहभेटीद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे.(Shirur Lok Sabha Election 2024)

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील (Ambegaon Vidhan Sabha) आदर्श गाव गावडेवाडी (Gawadewadi) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हिरकणी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती फेरी काढली. यावेळी १९३ मतदारांकडून लोकसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठीचे संकल्पपत्र भरुन घेतले. मतदारांना मतदानाचे महत्व यावर मार्गदर्शन करुन लोकसभा व विधानसभेसाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे व गावाची मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. स्वीप अधिकारी नारायण गोरे, मुख्याध्यापिका शशिकला चिखले आदींनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आदर्श गाव अवसरी बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी १९६ ग्रामस्थांकडून संकल्पपत्रे भरून घेतली. विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना लोकसभा व विधानसभेसाठी निवडणूकीत जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन केले.

शिरूर विधानसभा (Shirur Vidhan Sabha) सभा मतदार संघात शिरूर ग्रामीण अंगणवाडी सेविकांमार्फत गृहभेटीद्वारे मतदान जागृती करण्यात आली.
अंगणवाडी सेविकांनी मतदारांना मतदानाचे महत्व पटवून दिले आणि मतदानात सहभाग घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त