Shirur-Pune Lok Sabha | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 13 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास बंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shirur-Pune Lok Sabha | १३ मे रोजी पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १३ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास पुणे शहर पोलीस सहआयुक्त प्रविण पवार (IPS Pravin Pawar) यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत.(Shirur-Pune Lok Sabha)

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे लोकसभांतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ तसेच शिरुर मतदार संघातील शिरुर व हडपसर विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या आदेशान्वये मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या ४८ तास अगोदर पासून बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले – ‘विरोधक बावचळे असून ते वेगवेगळ्या प्रकाराचा अजेंडा सेट करणे, वेगवेगळे विधाने करणे, षडयंत्र करणं असे प्रकार करतायेत’

Pune Lok Sabha | साड्या वाटप धंगेकरांच्या कार्यकर्त्यांना भोवलं, निवडणूक भरारी पथकाकडून गुन्हा दाखल

Devendra Fadnavis | पुण्यात आणखी नवीन प्रकल्प येतील, कायापालट होईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पुणेकरांना आश्वासन