Shree Laxmi Mata Mandir Pune | श्री लक्ष्मीमाता मंदिरात 3000 हापूस आंब्यांची आकर्षक आरास; भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी भाविकांची रीघ

पुणे : Shree Laxmi Mata Mandir Pune | अक्षय्य तृतीयेनिमित्त शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीमाता मंदिरात सुमारे ३ हजार हापुस आंब्यांची आरास आणि फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागल्याचे चित्र होते. (Shree Laxmi Mata Mandir Pune)

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul), पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल (Jayshree Bagul) यांच्या उपस्थितीत श्री. लक्ष्मीमाता देवीची आरती करण्यात आली. यावेळी देवीच्या चरणी तीन हजार हापुस आंबे अर्पण करण्यात आले.

दुपारी चारनंतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात छबिना आणि मिरवणुकीनंतर भाविकांना प्रसादस्वरूपात आंब्यांचे
वाटप करण्यात आले. याप्रसंगी घनश्याम सावंत (Ghanshyam Sawant), नंदकुमार बानगुडे
(Nandkumar Bangude), अमित बागुल (Amit Bagul), हेमंत बागुल (Hemant Bagul) ,कपिल बागुल
(Kapil Bagul), सागर बागुल (Sagar Bagul), सागर आरोळे, महेश ढवळे, बाबालाल पोळके, संतोष पवार, समीर शिंदे,
आदींसह पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती.

Web Title :  Shree Laxmi Mata Mandir Pune | An attractive array of 3000 hapu mangoes at Sri Lakshmimata Temple; Devotees line up for darshan in a devotional atmosphere

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CSR Award-2023 – Sudarshan Chemical | राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुदर्शन केमिकल्सला ‘सीएसआर अवॉर्ड-2023’ प्रदान

MSRTC – Mumbai To Alandi ST Bus | भाविकांसाठी खुशखबर ! मुंबई ते आळंदी बससेवा सुरू, जाणून घ्या वेळापत्रक आणि मार्ग

Pune News | पुणे : सुहास पटवर्धन – सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाबाबत शासनाच्या धोरणाची संपूर्ण अंमलबजावणी व्हावी

Maharashtra Tourism – MTDC | पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; 15 मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन