Sinhagad Express | मोटरमनने वेगमर्यादा न पाळल्याने सिंहगड एक्सप्रेस पकडताना प्रवाशाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने अनेक प्रवासी दररोज सिंहगड एक्सप्रेस ने मुंबई-पुणे असा प्रवास करतात. पिंपरी आणि चिंचवडमधील प्रवाशांसाठी स्वतंत्र सोय केली जाते. मात्र प्रवाशांच्या तुलनेत डब्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जागेसाठी अनेकदा प्रवाशांमध्ये वाद होतात. जागा पकडण्यासाठी प्रवाशांना नेहमीच कसरत करावी लागते. त्यामुळे अपघातही घडतात.(Sinhagad Express)

शुक्रवारी सकाळी ६:३० च्या दरम्यान पिंपरी स्थानकात (Pimpri Railway Station) वेगात गाडी आली. नियमानुसार फलाटावर गाडी येताना मोटरमनने वेगमर्यादा पाळली नाही. डबा पुढे गेला. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी धावताना फतिमल गुडेला खाली पडले. ते गाडीखाली गेले तेव्हा गाडी थांबण्यात आली. त्यांना तातडीने वायसीएम हॉस्पिटलमध्ये (YCM Hospital) नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.(Sinhagad Express)

पिंपरी, चिंचवड व लोणावळा या स्थानकांकरिता सिंहगड एक्स्प्रेसला स्वतंत्र डबे असल्यामुळे सर्व प्रवाशांची त्यात चढण्याकरता चढाओढ असते. त्यात भर म्हणजे या स्थानकांत सिंहगड एक्स्प्रेस अत्यंत वेगात आणली जाते आणि अचानक थांबवली जाते. बऱ्याच वेळा आपल्या नियोजित जागी न थांबता ती दोन ते तीन डबे पुढे थांबते. यामुळे ऐनवेळेस प्रवाशांची प्रचंड धावपळ होते.

यामध्ये प्रवासी पडून जखमी होतात, तसेच एकाच वेळी गर्दी झाल्यामुळे मोबाइल, पाकीटचोर गर्दीचा फायदा घेऊन
चोऱ्या करतात. नवखे प्रवासी बऱ्याच वेळा चालती गाडी बऱ्याच वेळा चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात आणि
अंदाज चुकल्याने खाली पडतात. काही अंतर फरपटत जातात किंवा गाडीच्या किंवा फलाटाच्या जागेत पडतात असे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol – Amit Shah | पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये ! पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मोहोळ दिल्ली दरबारी सक्रीय