Social Security Schemes – PF Account | 71 टक्के ज्येष्ठ नागरिकांकडे नाही PF आणि Pension ची सुरक्षा, म्हातारपणात सुद्धा करावं लागतंय काम
![senior-citizen](https://i0.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/06/senior-citizen.jpg?resize=750%2C450&ssl=1)
नवी दिल्ली : Social Security Schemes – PF Account | देशातील ज्येष्ठांची मोठी लोकसंख्या कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेच्या कक्षेत येऊ शकलेली नाही. यामुळे वृद्धत्वात लोकांना आर्थिक आणि आरोग्यसंबंधी आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, केवळ २९ टक्के वृद्धच ओल्ड एज पेन्शन अथवा प्रोव्हिडेंट फंड सारख्या योजनांमध्ये सहभागी होऊ शकले आहेत.(Social Security Schemes – PF Account)
ज्येष्ठांची जवळपास ७१ टक्के लोकसंख्या पीएफ आणि पेन्शनसारख्या कोणत्याही योजनेच्या कक्षेच्या बाहेर आहे. ही मोठी लोकसंख्या आर्थिक असुरक्षिततेचा सामना करत आहे.
बिझनेस स्टँडर्डने एका एनजीओच्या रिपोर्टच्या संदर्भाने दावा केला आहे की, २९ टक्के ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळते. वृद्ध महिलांना हा आधार पुरुषांच्या तुलनेत थोडा जास्त आहे. जवळपास १५ टक्के ज्येष्ठ अजूनही एखादे काम करून पैसे कमावत आहेत.
पुरुषांमध्ये हा आकडा २४ टक्के आणि महिलांमध्ये ७ टक्के आहे. मोठ्या शहरांमध्ये स्थिती आणखी खराब आहे. येथे जवळपास १७ टक्के ज्येष्ठांनाा आपला खर्च भागवण्यासाठी काम करावे लागत आहे. छोट्या शहरांमध्ये हा आकडा १४ टक्के आहे.
आर्थिक समस्यांसह आजारांशी सामना
चिंताजनक बाब ही आहे की, ज्येष्ठांची जवळपास एक तृतीयांश लोकसंख्येला मागील एक वर्षात कोणतेही इन्कम झालेले नाही. जवळपास ६५ टक्के ज्येष्ठ आर्थिक सुरक्षेच्या बाबतीत त्रस्त आहेत.
रिपोर्टनुसार, सीनियर सिटीजन आर्थिक समस्यांसोबतच आजारांचा देखील सामना करत आहेत. वरिष्ठ नागरिकांच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येला ब्लड प्रेशर आणि ४३ टक्के लोकांना डायबिटीज आहे.
युनायटेड नेशन्सच्या रिपोर्टमध्ये चिंता
मागील वर्षी युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, भारतात सोशल वेल्फेयर स्कीम्स बाबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये जागृतता खुप कमी आहे. २०५० पर्यंत देशाची २० टक्के लोकसंख्या ज्येष्ठ होईल. ज्येष्ठांसाठी तीन प्रमुख सरकारी योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना आणि अन्नपूर्णा योजना आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा