Social Welfare Assistant Commissioner Sangeeta Dawkhar | महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आणि कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : सहायक आयुक्त संगीता डावखर

पुणे (अनिल पाटणकर) – Social Welfare Assistant Commissioner Sangeeta Dawkhar | सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन तसेच स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे महान कार्य करणारे समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाज्योती नागपूर, समाजकल्याण विभाग,पुणे आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे (Pune District Education Association) मामासाहेब मोहोळ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन स्तरावर चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्व, एकांकिका व एकपात्री प्रयोग अशा विविध गटातील जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संगीता डावखर (Social Welfare Assistant Commissioner Sangeeta Dawkhar) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

पुण्यातील पौड रोडयेथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालय येथे पार पडलेल्या विविध स्पर्धांमध्ये पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी वक्तृत्व स्पर्धेसाठी संस्कार मंदिर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. राजेंद्र थोरात व प्रसिद्ध निवेदक, वक्त्या व लेखिका स्वाती महालंक यांनी परीक्षक म्हणून कार्य केले तर एकांकिका व एकपात्री प्रयोग स्पर्धेसाठी युवराज देवकर व सागर शिंदे हे परीक्षक होते.

यापैकी वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक : संतोष शिंदे, जेएसपीएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय, हडपसर, द्वितीय क्रमांक : स्नेहा भंडारी, अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी, पुणे, तृतीय क्रमांक : रोहन कवडे,कला वाणिज्य महाविद्यालय, वारजे, पुणे, कनिष्ठ विभाग, प्रथम क्रमांक : रोशनी गुप्ता, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पौड रोड, पुणे. यांनी बाजी मारली तर एकांकिका व एकपात्री प्रयोग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक : एकांकिका,” मी ज्योतीबा,मी सावित्री”, इन्सर्च इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीज, पुणे, प्रथम क्रमांक : एकपात्री , नम्रता अडसूळ, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर , द्वितीय क्रमांक : एकपात्री, प्रियांका मारणे, अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट, पुणे , तृतीय क्रमांक : एकपात्री, कल्याणी पाटील, धारेश्वर नर्सिंग महाविद्यालय, पुणे. यांनी बाजी मारली. Social Welfare Assistant Commissioner Sangeeta Dawkhar

यावेळी बोलताना संगीता डावखर म्हणाल्या “भारतीय समाजसुधारकांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणा देणारे
असून महात्मा फुले यांनी आधुनिक भारतीय समाजाची पायाभरणी केली.
त्यांचे ग्रंथ आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असून नव्या पिढीने ते वाचले पाहिजेत.
त्यांचे कार्य समजून घेतले पाहिजे, त्याकरिता अशा स्पर्धा युवकांना नक्कीच नवी स्फूर्ती देतील”
तर विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागाकडून नव्याने सुरू झालेल्या विविध शासकीय योजनांची माहितीही
त्यांनी दिली.या कार्यक्रमासाठी शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कवठनकर यांचीही उपस्थिती होती.
समाजकल्याण विभागाच्या मार्गदर्शनातून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. गंगाधर सातव यांनी सांगितले.

“स्पर्धांमुळे विद्यार्थी वाचनाकडे वळतात. उद्याचे वक्ते, विचारवंत, नेतृत्व स्पर्धांमधूनच घडते.
पण त्यासाठी शिवाजीराव भोसले म्हणतात त्याप्रमाणे वक्तृत्वासाठी वेडे झाले पाहिजे” असे डॉ.राजेंद्र थोरात यांनी
सांगितले तर वक्तृत्व कसे असावे याबद्दल स्वाती महलंक यांनी मार्गदर्शन केले.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शोभा तितर यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ. सुनीता डाकले,
डॉ. मेघना भोसले, श्री. विनोद रणपिसे. डॉ.रुपाली शेंडकर, प्रा. लक्ष्मण उकिरडे, डॉ. स्वाती शिंदे, प्रा. नीता देशमुख,
प्रा. स्मिता चव्हाण, प्रा. स्नेहा हिंगमिरे,प्रा. अमृता मोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title :-   Social Welfare Assistant Commissioner Sangeeta Dawkhar | Thoughts and work of Mahatma Jyotiba Phule inspiring for new generation: Assistant Commissioner Sangeeta Dawkhar

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On ESZ | राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये व संरक्षित जंगलांच्या सीमेभोवतीच्या 1 किमीच्या पट्टयातील बांधकामबंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Maharashtra Political News | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 13, राष्ट्रवादीचे 20 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

MP Sanjay Raut | ‘स्वयंभू असतात त्यांच्या मागे जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना…’, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला