Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीने सांगितला पहिल्या डेटचा किस्सा; “आम्ही बागेत फिरलो…”

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वातील सुंदर अप्सरा म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या निखळ हास्यावर व सौंदर्यावर अनेक जण आजही फिदा आहेत. अनेकांची स्वप्नसुंदरी असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने तिच्या पहिल्या डेटिंग विषयी सांगितले आहे. एका मुलाखती दरम्यान तिने पहिल्या डेटिंगचा मज्जेशीर किस्सा शेअर केला आहे.

 

 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अनेक चित्रपटांमधून (Sonalee Kulkarni Movies) आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर उमटवली आहे. तिचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. सोनालीने एका मुलाखती दरम्यान तिच्या कॉलेजमधील पहिल्या डेटचा (Sonalee Kulkarni First Date) किस्सा शेअर केला आहे. सोनाली म्हणाली की, “मी अकरावीमध्ये असताना पहिल्यांदा डेटवर गेले होते. त्यावेळी मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला शिक्षण घेत होते. माझी ती पहिली डेट फार बोरिंग होती. त्यामध्ये विशेष काही घडलं नाही. आम्ही कॉलेजमध्येच डेट केली. लेक्चर्सनंतर आम्ही मागे बागेत फिरलो. गप्पा मारल्या. त्यानंतर आम्ही फर्ग्युसन कॉलेजमधून चालत चालत आलो. त्यावेळी मी निगडीला राहत होते आणि कॉलेजपासून निगडीपर्यंत बसने प्रवास करायचे. तेव्हा मला घरी जायला एक तास लागायचा.”

 

 

 

पुढे ती म्हणाली की, “नंतर तो मला बसस्टॉपर्यंत सोडायला आला होता. जंगली महाराज रोडवर बस स्टॉपच्या बाजूला भेळ वाल्याचा गाडा आहे. तिथे आम्ही भेळ खाल्ली आणि मग त्याने मला बसमध्ये बसवलं आणि तो सुद्धा घरी गेला.” अशा पद्धतीची सोनालीची 11 वी मध्ये असताना पहिली डेट होती. तिने हा किस्सा सांगताच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. सोनाली सध्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. तिने 2021 साली कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) याच्यासोबत लग्नबंधनात अडकली.

 

 

 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तिची नटरंग (Natrang), पोस्टर गर्ल (Poster Girl), हिरकणी (Hirkani) चित्रपटातील भूमिका खूप गाजल्या होत्या. त्याचबरोबर तिचा ‘छत्रपती ताराराणी’ (Chhatrapati Tararani) या चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा ‘डेट भेट’ (Date Bhet) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तिने अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि संतोष जुवेकर (Santosh Juvekar) यांच्या सोबत स्क्रीन शेअर केली आहे.

 

 

Web Title : Sonalee Kulkarni | marathi actress sonalee kulkarni talk about her frist date in interview

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा