Sunetra Pawar On Supriya Sule | सुप्रिया सुळेंवर टीका करताना सुनेत्रा पवारांचा दावा, ”दहा वर्षे विरोधी बाकांवर बसणाऱ्या खासदारामुळे बारामतीचे प्रचंड नुकसान”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sunetra Pawar On Supriya Sule | बारामती लोकसभेच्या (Baramati Lok Sabha) महायुतीच्या उमेदवार (Mahayuti Candidate) सुनेत्रा पवार या नवख्या उमेदवार आहेत, असे सातत्याने म्हटले जात आहे. मात्र, विरोधकांच्या या प्रचाराला आज त्यांनी उत्तर दिले आहे. शिवाय, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना त्यांनी हा दावा केला आहे. सुनेत्रा पवार यांनी म्हटले की, दहा वर्षे विरोधी बाकांवर बसणाऱ्या खासदारामुळे बारामतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

सुनेत्रा पवार यांनी म्हटले, दहा वर्षे विरोधी बाकांवर बसणाऱ्या खासदारामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रचंड नुकसान झाले. येथे एकही मोठा प्रकल्प आलेला नाही. विकासाचा दहा वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्याचा निर्णय यंदा जनतेने घेतला आहे. जनता घड्याळापुढचे बटण दाबून मला आशीर्वाद देईल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, भारतीय संसदेस उज्ज्वल परंपरा आणि प्रतिष्ठा आहे, त्या अर्थाने संसदेत जाणे आव्हानात्मक आहे. मात्र, बारामती मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्याचे प्रभावी व्यासपीठ, म्हणून संसदेकडे पाहते, तेव्हा मला हे आव्हान जाणवत नाही. पहिल्यांदाच निवडणूक लढवीत असल्याचाही ताण नाही.

त्या पुढे म्हणाल्या, गावगाड्याला सोबत घेऊन कसे जायचे, अडल्यानडल्यांची कामे मार्गी कशी लावायची, याची शिकवण मला लहानपणापासून आहे. गेली पंचवीस-तीस वर्षे मी सामाजिक कार्यात असून लोकांचे प्रश्न सोडविण्याची धमक माझ्यात आहे.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, गेल्या दोन निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून विरोधी बाकांवर बसणारा प्रतिनिधी निवडून गेला. तरीदेखील केंद्रातील मोदी सरकारनेच या मतदारसंघात रस्ते, महामार्ग, रेल्वेमार्ग, पूल अशी विविध विकासकामे केली, हे जनता पाहत आहे.

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी पुन्हा देण्याचा निर्णय यंदा देशाच्या जनतेने घेतल्याचा दावा करत सुनेत्रा पवार म्हणाल्या, अशावेळी आपला प्रतिनिधीदेखील मोदींना साथ देणारा असेल, तर मतदारसंघाचा विकास वेगाने होईल, हे सुज्ञ मतदार ओळखून आहेत, म्हणून या वेळी मोदींना साथ देणारा लोकप्रतिनिधी निवडून पाठविण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असा दावा सुनेत्रा पवार यांनी केला.

महायुती सरकारचे कौतुक करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकार दमदार काम करत आहे. नरेंद्र मोदी यांनी देशात नवा आत्मविश्वास निर्माण केलाय.

त्यांच्याच विचाराचा खासदार बारामतीतून निवडून दिला तर बारामती लोकसभा मतदारसंघातील विकासाला ट्रिपल इंजिनची ताकद मिळणार आहे. जनता काम करणाऱ्यांनाच संधी देईल, याची मला खात्री आहे, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar Vs Sharad Pawar | एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारलाय : अजित पवार

Cheating Fraud Case Pune | पुणे : कंन्स्ट्रक्शन कंपनीत अपहार करुन 97 लाखांची फसवणूक, चार जणांवर FIR

Sanjay Kakade | संजय काकडे प्रचारात सक्रिय, म्हणाले ”पुण्याची जागा आम्हीच जिंकणार”, मुरलीधर मोहोळांचे बळ आणखी वाढले