Super Glue | सापाचे विष बनणार मनुष्यासाठी ‘संजीवनी’! शास्त्रज्ञांनी बनवला ‘सुपर ग्लू’, सतत वाहणारे रक्त सेकंदात करेल बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कॅनडाच्या वेस्टर्न युनिव्हर्सिटी (Western University) च्या शास्त्रज्ञांनी एक असा ‘सुपर ग्लू’ (Super Glue) तयार केला आहे, जो मनुष्याच्या पेशींना चिकटतो. या ग्लूद्वारे शरीराच्या एखाद्या भागातून सतत वाहत असलेले रक्त सेकंदात बंद करता येऊ शकते. हा ग्लू (Super Glue) शरीराच्या कापलेल्या भागावर चिकटून वाहणारे रक्त बंद करतो.

हा सुपर ग्लू ब्लड क्लॉटिंग एंझाइम रेप्टिलेज (Reptilase) किंवा बॅट्रोक्सोबिन (Batroxobin) द्वारे तयार केला गेला आहे.
बॅट्रोक्सोबिन धोकादायक लेन्सहेड सापांच्या (Lancehead Snakes) विषात मिळते.

वेस्टर्न युनिव्हर्सिटीत इंजिनियरिंगचे प्रोफेसर आणि स्टडीचे सह-लेखक किब्रेट मेक्कनिंट यांनी म्हटले, ट्रॉमा, जखम किंवा आपत्कालीन स्थितीत रक्त वाहत असताना हा सुपर ग्लू ट्यूबमधून काढून जखमेवर लावता येतो. यानंतर काही सेकंदासाठी यावर लेझर पॉईंटरसारखा प्रकाश दाखवावा लागेल. इतके की स्मार्टफोनची फ्लॅशलाईट सुद्धा यासाठी पुरेशी आहे.

अशा प्रकारे हा ग्लू जखमेवर चिकटेल आणि रक्त वाहने थांबवेल.
दक्षिण अमेरिकामध्ये लेंसहेड सापाला सर्वात विषारी मानले जाते.
हे मुळ महाखंडाच्या उत्तर भागात सापडतात.

 

फायब्रिन ग्लू पेक्षा जास्त वेगाने चिकटतो सुपर ग्लू

आपल्या प्रौढावस्थेत लेंसहेड साप 30 ते 50 इंच लांब होऊ शकतात.
ते सामान्यपणे कॉफी आणि केळ्याच्या झाडांमध्ये लपून आपली शिकार शोधतात.
हा साप एकावेळी 124 मिलीग्रॅमपर्यंत विष तयार करू शकतो.
पण, अनेकदा ते 342 मिलीग्रॅमपर्यंत विष एकत्र करतात.
नवीन सीलेंटच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये आढळले की, हा फायब्रिन गोंदाच्या चिकटण्याच्या ताकदीपेक्षा 10 पट जास्त आहे.

फायब्रिन गोंदाला सर्जन गोल्ड स्टँडर्ड मानतात. फायब्रिन गोंद जिथे 90 सेकंदात जखमेला बंद करतो, तिथे हा सुपर ग्लू केवळ 45 सेकंदात ती बंद करतो. टाके न मारता जखम बंद करण्यासाठी या ग्लूचा वापर होऊ शकतो. याचा वापर त्वचेत खोल जखम, फाटलेली मोठी नस आणि गंभीर प्रकारे जखमी लिव्हरसारख्या स्थितीत केला जातो.

Web Title : Super Glue | venom from lancehead snake is used to create a super glue that stops life threatening bleeding in seconds

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Builder Paranjape Brothers | पुण्यातील परांजपे बंधूंविरोधात वसुंधरा डोंगरेंच्या वकिलांकडून 545 पानांचे पुरावे न्यायालयात सादर; अटकपुर्व जामिनावर 29 जुलैला सुनावणी

PM Modi-Sharad Pawar Meeting | शरद पवार भेटण्यापुर्वी पीएम मोदी कोणाला भेटले? भेटीगाठीमुळं राजकीय चर्चेला उधाण, समीकरणं बदलणार ?

Hibiscus Flower | केसांची हरवलेली चमक परत आणण्यास मदत करेल जास्वंद; जाणून घ्या