Superstar Dhanush | अभिनेता धनुषने सिनेविश्वात येण्यापूर्वी बदलले नाव; बॉडी शेमिंगचाही करावा लागला होता सामना

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य सिनेविश्वामध्ये अनेक सुपरस्टार हिरो आहेत ज्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यापैकीच एक प्रसिद्ध अष्टपैलू अभिनेता म्हणजे सुपरस्टार धनुष (Superstar Dhanush). अभिनेता धनुष याचे दाक्षिणात्य हिरोंमध्ये आदराने नाव घेतले जाते. आज प्रेक्षकांच्या लाडक्या धनुषचा वाढदिवस (Superstar Dhanush Birthday) आहे. धनुष त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या या सिनेविश्वातील प्रवासामध्ये देखील अनेक अनुभव त्य़ाला आले आहेत. तसेच धनुषने या सिनेविश्वात येण्यापूर्वी त्याचे नाव देखील बदललेले आहे. आज अभिनेता धनुषच्या (Superstar Dhanush) वाढदिवसानिमित्ताने त्याच्या आयुष्य़ातील काही पैलू जाणून घेऊया.

अभिनेता धनुष याचा जन्म तमिळनाडू (Tamil Nadu) मधील चेन्नई (Chennai) मध्ये 28 जुलैला 1983 रोजी झाला. सिनेविश्वातील एका दिग्दर्शकाच्या घरात धनुषचा जन्म झाला असल्यामुळे त्याला या क्षेत्राचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. मात्र त्याला या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा नव्हती. त्याला लहानपणापासून जेवण बनवण्याची आवड होती. हिच आवड त्याला प्रोफेशन म्हणून जपायची होती. अभिनेता धनुषला शेफ व्हायचे होते. मात्र यासाठी घरच्यांची परवानगी नसल्याने त्याला ते सोडावे लागले. पुढे त्यांने त्याच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेला ‘थुल्लुवाधो इलमई’ (Thulluvadho Ilamai) या चित्रपटामधून 2002 साली सिनेविश्वामध्ये पदार्पण (Dhanush Debut Movie) केले. आणि आजतागायत अभिनेता धनुषची घौडदौड सुरु आहे.

अभिनेता धनुषला (Superstar Dhanush) संगीताची देखील आवड आहे. त्यांचे पहिले गाणे ‘कोलावेरी दी’ (Kolaveri Di) हे त्याने अवघ्या सहा मिनिटांत लिहिले होते आणि हे गाणे अवघ्या 35 मिनिटांत रेकॉर्ड झाले. 2011 मध्ये रिलीज झालेले हे गाणे त्यावेळी देशात सर्वाधिक सर्च केलेले गाणे होते. आजही तरुण या गाण्याला विसरलेले नाही. अनेक हिट चित्रपट (Dhanush Hit Movie) प्रेक्षकांना दिले आहेत. त्याच्या चित्रपटांनी अक्षरशः बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अभिनेता धनुषचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र त्याचे खरे नाव हे धनुष (Dhanush Real Nmae) नाही. त्याने सिनेविश्वामध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याचे नाव बदलले आहे. अभिनेता धनुषचे खरे नाव ‘वेंकटेश प्रभु कस्तूरी राजा’ (Venkatesh Prabhu Kasturi Raja) असे आहे. त्याने मारी (Maari), कर्णन (Karnan), वेदा चेन्नई (Vada Chennai) असे अनेक चित्रपट दिले आहेत. त्याचा बॉलीवुडमधील (Bollywood News) अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सोबतचा ‘रांझणा’ (Raanjhanaa) हा चित्रपट देखील गाजला होता. मात्र सुरुवातीच्या काळात धनुषला अनेकांनी त्याच्या लूकवरुन चिडवले होते.

अभिनेता धनुष याचे वडिल कस्तुरी राजा (Director Kasthuri Raja) हे नावाजलेले दिग्दर्शक होते.
मात्र तरी सुरुवातील धनुषला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले. त्याला अनेकांनी त्याच्या दिसण्यावरुन हिणवले होते.
याबद्दल त्याने स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. धनुषने सांगितले की, 2003 मध्ये ‘कदल कोंडन’ या
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला सेटवर खूप ट्रोल करण्यात आले होते.
त्यावेळी लोक त्याला ऑटो ड्रायव्हर म्हणायचे आणि त्याची चेष्टा करायचे.
यासोबतच त्यांचे बॉडी शेमिंगही (Body shaming To Dhanush) करण्यात आले. मात्र यावरुन त्याने न डगमगता त्याचे काम करत राहिला व आज तो दाक्षिणात्य चित्रपट विश्वातील एक महत्त्वाचा अभिनेता बनला आहे. लवकरच त्याचा ‘कॅप्टन मिलर’(Captain Miller) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणीकंद पोलिस स्टेशन : वाघोलीत वाईन शॉपवर रात्री 11.30 वाजता ‘राडा’; तरुणाच्या डोक्यात घातली बियरची बाटली