Tamanna Bhatia | रजनीकांत व तमन्ना यांच्यातील वयाच्या अंतरामुळे ते कसे करु शकतात एकत्र काम?, यावर तमन्नाने दिले चोख उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सर्वांच्या तोंडामध्ये ‘जेलर’ चित्रपटातील (Jailer Movie) गाणे झळकत आहे. ‘कावाला’ या गाण्याने (kaavaalaa Song) सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यामधील अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) हिचा एनर्जेटिक डान्स पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहेत. या गाण्यामध्ये व जेलर चित्रपटामध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया ही थलायवा रजनीकांत (Tamanna And Rajinikanth) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मात्र त्या दोघांमधील वयाचे अंतर हा आता चर्चेचा विषय झाला आहे. रजनीकांत व तमन्ना यांच्यामध्ये तब्बल 39 वर्षांचे अंतर (Tamanna And Rajinikanth Age Gap) आहे. लोकांच्या या प्रश्नावर अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) हिने स्पष्टच उत्तर दिले आहे.

दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांची लोकप्रियता अफाट आहे. आजही ते चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक (Rajinikanth Upcoming Movie) नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात. आता लवकरच त्यांचा ‘जेलर’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रजनीकांत यांची हिरोईन म्हणून तमन्ना स्क्रीन शेअर करणार आहे. तमन्ना हिचे वय अवघे 33 आहे तर रजनीकांत यांचे वय 72 वर्षे (Rajinikanth Age) आहे. अनेक लोकांनी एवढे वयाचे अंतर असताना हिरो हिरोईन म्हणून कसे एकत्र काम करतात असा प्रश्न केला होता. एका मुलाखतीमध्ये देखील तमन्ना या बद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने उत्तर देत सांगतिले की “मी एवढेच म्हणेन की तुम्ही कलाकरांमधील वयाचा फरक का पाहत आहात? दोन पात्रे पडद्यावर साकारताना पाहावी.

पुढे तिने हॉलीवुडचे (Hollywood) देखील उदाहरण दिले. ती म्हणाली की, हॉलीवुड अॅक्टर टॉम क्रूजने (Tom Cruise) त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत, अनेक अॅक्शन चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि अॅक्शन सीक्वेन्स करण्यासाठी कधीही स्टंट डबलचा वापर केला नाही. तमन्ना पुढे म्हणाली, “माझ्या वयाबद्दल बोलायचे झाले तर मी वयाच्या 60 व्या वर्षीही टॉम क्रूझचे स्टंट बघेन आणि मला त्या वयातही आयटम डान्स करायला आवडेल.” तिच्या या स्पष्ट उत्तरामुळे तिच्या व रजनीकांत यांच्या वयातील अंतरावर टीका करणाऱ्या लोकांची बोलती बंद झाली आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही सध्या यशाच्या शिखरावर आहे. ‘जेलर’ चित्रपटानंतर ती बिग बजेट ‘भोला शंकर’ या चित्रपटामध्ये (Bhola Shankar Movie) झळकणार आहे. भोला या चित्रपटामध्ये अभिनेत्री तमन्ना 67 वर्षांचे अभिनेते चिरंजीवी (Chiranjeevi) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या आधी तिचा रिलीज झालेला लस्ट स्टोरीज् 2 (Lust Stories 2) या चित्रपटाची देखील खूप चर्चा झाली. यामध्ये तिच्या सोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या विजय वर्मा (Vijay Verma) या अभिनेत्यासोबत तिचे अफेअर (Tamanna Bhatia Affair) सुरु आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | दुकानावर कर्ज घेतले असतानाही खोटी माहिती देऊन 84 लाखांची फसवणूक;
वकिलासह हवेली उपनिबंधक कार्यालयातील एकावर गुन्हा दाखल

Pune Crime News | विहिरीत रिंग बसविताना मुरुम ढासळून चार मजूर गाडले; इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीतील घटना