TCS Jobs | टीसीएसला 80000 इंजिनियर्सची अत्यंत गरज, इच्छा असूनही भरू शकत नाहीत इतक्या जागा

नवी दिल्ली : TCS Jobs | देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसमध्ये सध्या जवळपास ८० हजार जागा रिकाम्या आहेत. कंपनीला ही पदे भरायची आहेत. पण, अनेक प्रयत्न करूनही ही पदे भरण्यात अपयश येत आहे. टीसीएसचे म्हणणे आहे की, ते स्किल गॅपच्या कारणामुळे ही पदे भरू शकत नाहीत. त्यांना या पदांवर ज्या क्षमतेच्या तरूणांना नोकरी द्यायची आहे ते त्यांना मिळत नाहीत.(TCS Jobs)

टीसीएस रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे ग्लोबल ऑपरेशन्स हेड हेड अमर शेटये यांनी टाऊनहॉलमध्ये खुलासा केला की,
कंपनीला ८०००० इंजिनियर्सची आवश्यकता आहे. पण, योग्य व्यक्तींच्या कमतरतेमुळे ही पदे रिक्त पडलेली आहेत.
कंपनी कॉन्ट्रॅक्टर्सद्वारे ही गॅप भरण्याचा प्रयत्न करत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या टाऊनहॉलमध्ये सहभागी एक कर्मचारी म्हणाला की, कंपनीचे म्हणणे आहे की,
प्रोजेक्टच्या गरजेनुसार एम्प्लॉईजचे स्किल सेट मॅच करता येत नाही.

मात्र, या रिपोर्टवर टीसीएसने सध्या काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
विशेष म्हणजे आणखी एक रिपोर्ट असे सांगतो की, देशातील मोठ्या कंपन्या सध्या जवळपास १० हजार फ्रेशर्सना
नोकरी देण्यास उशीर करत आहेत. यामध्ये टीसीएसचा सुद्धा समावेश आहे.
आपली स्थिती उघड होऊन त्याचा परिणाम मार्केटवर होऊ नये, यासाठी कंपन्या हे कारण पुढे करत असाव्यात, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfer | औंध: दरोड्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, येऊन पाहतात तर घर भुईसपाट; 5 जणांवर FIR