तेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS अधिकार्‍यांसाठी खरेदी केल्या 32 लग्झरी कार, विरोधकांचा जोरदार हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (telangana kcr govt) यांनी आयएएस अधिकार्‍यांसाठी IAS Officer 25-30 लाख किंमत असलेल्या 32 लग्झरी कार Luxury Car खरेदी केल्या आहेत. या कार सीएम राव यांनी अशा वेळी खरेदी केल्या आहेत जेव्हा राज्यावर 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

मुख्यमंत्री राव यांनी 32 लग्झरी कार खरेदी केल्या आहेत.
या सर्व कार रविवारी प्रगती भवनमध्ये आणण्यात आल्या.
या कार राज्याच्या अतिरिक्त कलेक्टर्सना दिल्या जाणार आहेत.
मात्र, सीएम राव यांच्या या पावलावर मोठी टिका होत आहे.

modi government schemes | सुरू करा ‘हा’ दमदार नफा देणारा बिझनेस, होईल 9 लाखांपर्यंत कमाई; मोदी सरकार सुद्धा करते मदत

एकीकडे देशभरातील अनेक लोक आपल्या लग्झरी कार अ‍ॅम्ब्युलन्स Ambulance किंवा कोरोना रूग्णांच्या Corona Patient सेवेत लावत आहेत,
तर इकडे तेलंगनाचे मुख्यमंत्री राव (telangana kcr govt) यांनी आपल्या अतिरिक्त कलेक्टर्सना IAS Officer खुश करण्यासाठी 32 लग्झरी कार खरेदी केल्या आहेत.
सीएम राव यांनी 32 किआ कार्निव्हल कार खरेदी केल्या आहेत.
ज्यापैकी प्रत्येक कारची अंदाजे किंमत 25-30 लाख रुपये आहे.

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नवीन वाहनांची पाहणी केली,
यांनतर तेलंगनाचे परिवहन मंत्री अजय कुमार Transport Minister Ajay Kumar यांनी राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार आणि अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत हैद्राबादमध्ये मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान प्रगती भवनमध्ये गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.

बेडची व्यवस्था, गरीबांवर उपचार आवश्यक
विरोधी पक्षांनी तेलंगना सरकारच्या या पावलावर कठोर टिका केली आहे.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले की, कोरोना संकटादरम्यान या पैशांचा वापर बेडची संख्या वाढवणे आणि गरीबांना मोफत उपचार पुरवण्यासाठी केला पाहिजे होता.
हे तेलंगना सरकारचे बेजबाबदारपणाचे पाऊल आहे. दरम्यान, भाजपाने सुद्धा मुख्यमंत्री राव यांच्यावर टिका केली आहे.

Web Title : telangana kcr govt purchased 32 luxury vehicles for ias officers amidts covid opposition codemns but kcr decided to take vehicles

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट