Theur News | थेऊरचे प्रयोगशील शेतकरी विजय कुंजीर यांना आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार

थेऊर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Theur News | कृषी क्षेत्रात (Agricultural sector) उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांस जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार (Adarsh Krishinistha Shetkari Puraskar) दिला जातो यावर्षी हवेली तालुक्यातील थेऊर येथील प्रगतिशील शेतकरी विजय एकनाथ कुंजीर (Vijay Eknath Kunjir) यांना जाहीर झाला आहे या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पासून हा पुरस्कार स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात छोटे खाणी कार्यक्रम घेऊन दिला जातो. Theur News | Vijay Kunjir, an experimental farmer from Theur, was awarded the Ideal Farmer Award

विजय कुंजीर हे प्रयोगशील शेतकरी (Farmers) त्यांचे शिक्षण पदवी पर्यंत झाले त्यांना आपल्या वडिलांकडून शेतीमधील विविध प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
गेल्या आठ वर्षात पॉलिहाऊसच्या (Polyhouse) माध्यमातून त्यांनी देशी विदेशी फुलांची शेती केली.
अनेक विदेशी प्रजाती आयात करून नवीन फुलांचे उत्पादन घेतले.
ही उत्पादित फुले देशाच्या वेगवेगळ्या भागात पाठवली जातात तसेच पाच वर्षांपासून रोपवाटिकाक्षेत्रात काम करून उल्लेखनीय कामगिरी केली.
परिसरातील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञान संदर्भात मार्गदर्शन देण्याचे काम ते करतात.

कुंजीर याची या पुरस्कारासाठी निवड झाल्यावर गावातील तरुण शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला यामुळे अनेकांना अधिक उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळाली अशी प्रतिक्रिया मिळाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption Trap | 40 हजाराची लाच घेताना तरुण अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Bombay High Court | बदल्यांमध्ये राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप नकोच, कठोर नियमनाची गरज – हायकोर्ट

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केली ‘ही’ कळकळीची विनंती