Video : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही? पती निखिल जैनने दिले उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहां (Nusrat Jahan) आणि तिचा पती निखिल जैन यांनी आपआपले मार्ग वेगळे केले आहेत. दोघे मागच्या वर्षापासून एकमेकांपासून वेगळे राहात आहेत. याशिवाय नुसरत जहांच्या (Nusrat Jahan) प्रेग्नंसीचे वृत्त सुद्धा सर्वत्र पसरले आहे. पती निखिलचे म्हणणे आहे की, त्याला नुसरत प्रेग्नंट असल्याबाबत काहीच माहिती नाही.

सोबतच नुसरतचे अभिनेता यश दासगुप्ता सोबत अफेयर असल्याची सुद्धा चर्चा आहे.
लोकांच्या मनात नुसरतच्या प्रेग्नंसी बाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अभिनेत्रीनंतर निखिल जैनने इंडिया टुडेशी, आपल्या नात्यात आलेला दुरावा आणि नुसरतने केलेल्या आरोपांवर खुलेपणाने चर्चा केली आहे.

निखिल काय म्हटले…

अभिनेत्री नुसरत जहांचे म्हणणे आहे की, तुर्की मॅरेज अ‍ॅक्टनुसार निखिल सोबतचा तिचा विवाह अमान्य आहे.
तिचे आणि निखिलचे इंटरफेथ मॅरेज (दोन वेगळ्या धर्माच्या लोकांमध्ये झालेला विवाह), ज्यास भारतात कायदेशीर प्रकारे मान्यतेची आवश्यकता होती, परंतु असे झाले नव्हते. कायदेशीर प्रकारे दोघांचा विवाह मान्य नाही.

ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होते, ज्यामुळे घटस्फोटाचा प्रश्न निर्माण होत नाही.
यावर इंडिया टुडेशी बोलताना निखिलने म्हटले की, माझ्यानुसार, हा विवाह कायदेशी होता, तिने जे काही म्हटले आहे त्यावर मला काहीही म्हणायचे नाही. आमचा मुद्दा कोर्टापर्यंत पोहचला आहे.
मी सिव्हिल सूट फाईल केला आहे.
मी पर्यंत यावर कोणतेही कमेंट करणार नाही जोपर्यंत मॅटर कोर्टात आहे.

निखिल जैनने कन्फर्म करत म्हटले की, आम्ही दोघांनी आपले मार्ग वेगळे केले आहेत आणि मागच्या वर्षी नोव्हेंबरपासून वेगळे राहात आहोत. निखिलने पुढे म्हटले, कोर्टात मी सिव्हिल सूट फाइल केले आहे, त्या मॅटरला रद्द (एन्लमेंट ऑफ द मॅटर) करण्यासाठी केले आहे, कारण विवाह तुर्कीमध्ये झाला होता.
आपसातील सहमतीने वेगळे होण्यासाठी नव्हे, किंवा घटस्फोटासाठी केला नाही.

नुसरतने काय म्हटले…

नुसरत जहांने म्हटले की, निखिल सोबत मी माझे मार्ग खुप अगोदरपासूनच वेगळे केले होते.
परंतु मला याबाबत कुणालाही माहिती देणे योग्य वाटले नाही.
मला माझी पर्सनल लाईफ कुणासोबत शेयर करायची नव्हती.
आमचा विवाह कायदेशीर प्रकारे मान्य नाही आणि कायद्याच्या दृष्टीने आम्ही दोघे विवाहित नाही.
दोघांमध्ये खुप तणावाची स्थिती आहे.

Rakhi Sawant on Baba Ramdev | कोरोना अन् रामदेव बाबा सारखेच (व्हिडीओ)

Web Title :  tmc mp and actress nusrat jahan nikhil jain comment on marriage separation nusrat jahan pregnancy nusrat jahan relationship yash dasgupta