Uddhav Thackeray On Mahayuti Govt | उद्धव ठाकरेंच्या यवतमाळमधील सभेला कडक उन्हातही तुफान गर्दी, महायुती सरकारवर केला घणाघात, ”एक फूल दोन हाफ…”

यवतमाळ : Uddhav Thackeray On Mahayuti Govt | शिवसेना ठाकरे गटाचा (Shivsena UBT) जनसंवाद मेळावा आज यवतमाळमधील गांधी लेआउट मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी अंबादास दानवे, किशोर तिवारी, संजय देशमुख आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे कडक उन असून देखील राळेगाव विधानसभा मतदार संघातील महिला-पुरुषांची मोठी उपस्थिती होती. उन्हाची तीव्रता असतानाही नागरिकांची गर्दी लक्षवेधक ठरली.

या जनसवांद मेळाव्यात राळेगाव, पांढरंकवडा, बाभुळगाव येथील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे म्हणाले, एक फुल दोन हाफ राज्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. यवतमाळ जिल्ह्यात येऊन मोदींनी आश्वासन दिले त्याचे काय झाले. निवडणुकीच्या तोंडावर मोदी इथे येतात. त्यांच्या हाती नाही तर त्यांचे नशीब तुमच्या हाती आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणार होते. इथे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतमालाला बाजारभाव नाही. एक उद्योग यांनी यवतमाळमध्ये आणला नाही. या गद्दारांना धडा शिकवा. त्याकरीता तुमच्या विश्वासावर या लुटारुंच्या विरुद्ध मैदानात उतरलो आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, आता उन तापायला लागले आहे. आपल्याला गद्दारांना उन्हात आणायचे आहे.
इथल्या शेतकऱ्यांची घे माय धरणी ठाय अशी अवस्था झालेली असताना त्यांना पर्वा नाही.
मुख्यमंत्री झाल्यावर राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करीन म्हणणारे शिंदे एक वर्षात राज्यात ४ हजार ७५६ शेतकरी
आत्महत्या झाल्या तरी एक शब्द बोलत नाही. इथले पालकमंत्री स्वतःचा स्वार्थ पाहतात, असा घणाघात ठाकरे यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rural Police | पौड पोलिसांकडून गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर मोठी कारवाई, अड्डा उध्वस्त (Video)

Pune Crime News | पुण्यात घरफोडीचे सत्र सुरुच, वानवडी परिसरात 29 लाखांचा ऐवज लंपास

Sanjay Raut On Vasant More | वसंत मोरेंना राऊतांचा सल्ला, वॉशिंग मशिनच्या दिशेने जाऊ नये, प्रकाश आंबेडकरांना म्हणाले…