खुशखबर…आता मोबाईल कंपनीचे अनचाहे मेसेजेस, कॉल्स थांबणार

कोलकाता: वृत्तसंस्था

कोणत्याही महत्वाच्या कामात असताना मोबाईल कंपनीचे भांडावून सोडणारे कॉल आणि आणि संदेश नेहमीच ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरतात पण आता यामधून लवकरच सुटका मिळणार आहे. ‘ट्राय’ ने याविषयी नवीन नियमावली तयार केली आहे. यामध्ये ग्राहकांना नको असलेले व्यावसायिक मेसेज व कॉल बंद करता येणार आहे.

देशातील टेलिकॉम नेटवर्कवर दर महिन्याला जवळपास ३० अब्ज नको असलेले मेसेज येत असतात. यातून फोन ग्राहकाची सुटका करण्यासाठी ‘ट्राय ‘ ने नियमावली तयार करून त्यासंबंधी ११ जूनपर्यंत भागधारकांकडून मते मागविली आहेत. ट्राय’चे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी सांगितले, की ‘ट्रायकडून अशा प्रकारचे नियम पहिल्यांदाच लागू करण्यात आले आहेत. यापुढे ज्या टेलिमाकेर्टिंग कंपन्या केले जाणारे मेसेज आणि कॉल रोखण्यात अपयशी ठरतील अशा कंपन्यांना ‘ट्राय ‘ ने एक हजार ते ४६ लाख रुपयांपर्यंत दंड आकाराला जाऊ शकतो.

ग्राहकांना हि नक्कीच आनंदाची बातमी आहे. नको असलेले मेसेज आणि येणारे कॉल ग्राहकांना थांबविता येणार आहेत. याशिवाय ग्राहकांना कोणत्या प्रकारचे मेसेज हवे आहे त्याविषयी ग्राहकांकडून परवानगी मिळविण्यासाठी ‘थर्ड पार्टी ‘कडे प्रस्ताव ठेवला आहे.

तुम्हीच निवडा तुम्हाला हवा असलेला पर्याय

-व्यावसायिक कॉल आणि मेसेज निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

-व्यावसायिक मेसेज प्राप्त करण्यासाठी वेळ ठरवता येणार आहे.

– १९०९ वर कॉल अथवा मेसेज करून तसेच वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे व्यावसायिक मेसेज बंद करता येतील.

-मेसेजवर कोणताही आक्षेप नसल्यास ओटीपीद्वारे थर्ड पार्टी, टेलिमार्केटर्सना कळवू शकता.

-ग्राहकांना हवं तेव्हा व्यावसायिक मेसेज बंद करता येतील.