Uttam Nagar Pune Crime News | पुणे : मित्राकडून अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Uttam Nagar Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला (Minor Girl Rape Case Pune). यातून पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2022 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत पीडीत मुलीच्या राहत्या घरी घडला आहे.

याबाबत पीडीत अल्पवयीन मुलीने शुक्रवारी (दि.4) उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Staton) फिर्याद दिली आहे. यावरुन 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर आयपीसी 376, 376/2/एन, 376(3) सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच बिल्डींगमध्ये राहत असून ते एकमेकांचे मित्र आहेत. आरोपीने पीडीतेच्या घरात कोणी नसताना घरी येऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून लग्नाचे आमिष दाखवले. मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बसमध्ये तरुणीचा विनयभंग

पुणे : पीएमपीएमएल बसमधून (PMPML Bus) प्रवास करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीला अश्लील स्पर्श (Bad Touch) करुन
तिला अश्लील व्हिडीओ (Porn Videos) दाखवून तिचा विनयभंग केला (Molestation).
हा प्रकार शुक्रवारी (दि.3) सायंकाळी साडेसहा ते पावणे सात यावेळेत घडला आहे.
याप्रकरणी शिवीजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Pune) गुलाम हुशेन महम्मद इदरीस
(वय-27 रा. हरिहरपुर ता. तुलसीपुर जि. बलरामपुर उत्तर प्रदेश सध्या रा. वारजे माळवाडी फुटपाथवर) याच्यावर
आयपीसी 354, 354(अ)(1), 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust | ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम