तुमचा WhatsApp DP कोण पाहत तर नाही ना? ‘या’ पध्दतीनं तपासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगभरात WhatsApp, Facebook, Twitter आणि Instagram सारख्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. WhatsApp च्या युजर्सची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कंपनीकडून आपल्या युजर्ससाठी नवंनवे फिचर्स आणण्याचा प्रयत्न असतो.

बहुतांश स्मार्टफोन युजर WhatsApp चा वापर करत असतात. WhatsApp वर आपला डिस्प्ले फोटो (DP) ठेवला जातो. मात्र, हा फोटो कोणी पाहिला की नाही हे समजत नसते. पण आता हे तुम्हाला समजू शकणार आहे. तुमचा WhatsApp DP कोण पाहत आहे, हे जाणून घेता येऊ शकते.

ही प्रोसेस करा फॉलो…

– एक अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. गुगल प्ले स्टोरवर तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये WhatsApp Who Viewed Me या WhatsApp Tracker नावाचे अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार आहे.

– हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर युजरला 1mobile market हेही डाउनलोड करावे लागणार आहे. कारण या अ‍ॅपशिवाय WhatsApp Who Viewed Me डाउनलोड होणार नाही. 1mobile market आपोआपच डाउनलोड होईल.

– WhatsApp Who Viewed Me अ‍ॅप इन्स्टॉल झाल्यानंतर युजर त्या लोकांना पाहू शकतात, जे तुमचा WhatsApp प्रोफाईल फोटो पाहतात.

24 तासांत DP पाहिला याची माहिती मिळणार…

या अ‍ॅपच्या माध्यमातून युजरला फक्त त्या लोकांबद्दल माहिती मिळेल, ज्यांनी गेल्या 24 तासांत तुमचा DP पाहिला असेल. अ‍ॅप युजरसमोर Contact कॅटेगरी ठेवेल, ज्यात App तुमचा फोटो पाहणाऱ्यांची लिस्ट समोर येईल.

अ‍ॅपच्या सुरक्षिततेबाबत अधिकृत माहिती नाही

WhatsApp Who Viewed Me हे अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करण्यापूर्वी पूर्णपणे वेरिफाय करा. सध्या हे अ‍ॅप युजर्ससाठी किती सेफ आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे युजर्स आपल्या जबाबदारीवर हे अ‍ॅप डाउनलोड करू शकतात.