असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करणार: कामगार राज्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा अॉनलाईन
राज्यात सुमारे सहा लाख नोंदणी केलेले घरेलू कामगार असून या कामगारांचा समावेश असंघटित कामगारांमध्ये करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली.

घरेलू कामगारांच्या संदर्भात देशमुख म्हणाले, घरेलू कामगारांना असंघटित कामगारांमध्ये समावेश केल्याने असंघटित कामगारांसाठी असलेले लाभ त्यांना लागू होतील. त्यात कामाचे दर निश्चित करणे, दरवर्षी त्यात वाढ करणे यासारख्या बाबींचा समावेश आहे.असंघटित कामगार कल्याणासाठी एकत्रित कल्याण मंडळ काढण्याचा देखील शासनाचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.