आधार क्रमांक ऑनलाइन शेअर करताय…. मग जरा हे वाचा

अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डची गरज लागते .आधार कार्डाची ऑनलाइन माहिती देताना आवश्यक ती खबदारी घ्या असे आवाहन यूआयडीएआयने शनिवारी केले. ‘मेरा आधार, मेरी पहचान’ असं गुगलवर सर्च केल्यानंतर काही व्यक्तिंच्या आधारकार्डांचे तपशील समोर आला आहे. मात्र , यूआयडीएआयने याचा आधार कार्डाच्या सुरक्षेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिक अनेकदा आधारसह अन्य व्यक्तिगत माहिती इंटरनेटवर देत असतात त्यावेळी नागरिकांनी अशी माहिती देताना काळजी घेतली पाहिजे असे ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने’ म्हटले आहे.