आपण कोणता समाज निर्माण करतोय? : राष्ट्रपती कोविंद

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
कठुआ बलात्कार प्रकरणाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. देशातल्या कोणत्याही भागात अशा प्रकारची घटना घडते हे लज्जास्पद आहे, अशा कठोर शब्दांमध्ये राष्ट्रपतींनी कठुआ बलात्कार प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केला. आपला समाज नेमका कुठे जातोय, याचा विचार आता आपण करायला हवा.” राष्ट्रपती कोविंद जम्मू काश्मीरमधील श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभात बोलत होते.