आम्ही कायम कर्मवीर भाऊराव पाटील याचे ऋणी : विश्वजीत कदम

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन 
रयत शिक्षण संस्था आणि साधना संकुल यांच्याशी कदम साहेबांचे अतूट नाते होते. ते आम्ही कदम कुटुंबिय यापुढे जपणार आहोत. आम्ही कायम कर्मवीर भाऊराव पाटील याचे ऋणी आहोत. कारण पतंगराव कदम साहेबांवर कर्मवीरांचे संस्कार आणि रयतेचा मी विद्यार्थी आहे. याचा त्यांना नेहमी गर्व आणि अभिमान होता. साधना ही शिक्षणाची पंढरी आहे. कदम साहेबांच्या नंतर आम्ही कुटुंबिय आयुष्यभर रयतेचे सेवक म्हणून काम करू.अशा शब्दात विश्वीजीत कदम यांनी भावना व्यक्त केली.

आम्ही कायम कर्मवीर भाऊराव पाटील याचे ऋणी : विश्वजीत कदम

रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्था, पश्चिम विभाग, पुणे व सर्व रयत सेवक यांच्यावतीने रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व कर्तबगार माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली (शोकसभा) चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम हे बोलत होते.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, दिलीप तुपे, चेतन तुपे, प्रवीण तुपे, विजयराव कोलते,  प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी, दशरथ जाधव, प्राचार्य डॉ. के. डी. जाधव, डिंगने सर, आदी उपस्थित होते. या मान्यवरांनी दिवंगत पतंगराव कदम यांच्या आठवणींना त्यांच्या भाषणात उजाळा देखील दिला.

यावेळी पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले की, धेय्यवेडा स्वतःला वाहून घेणारा व माणसावर मायेची जादू करणारे व हडपसरचे भाग्यविधाते म्हणजे कदम साहेब होते. पुणे महानगरपालिकेच्या वतीने हडपसरमध्ये विठ्ठलराव तुपे नाटयगृह सुरु करत आहोत त्यामध्ये हडपसरचे भाग्यविधाते म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने कलादालन सुरु करणार आहोत. त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, एस. एम. जोशी, विठ्ठलराव तुपे, रामभाऊ तुपे, ग. प्र. प्रधान यांच्याबरोबर पतंगराव कदम यांच्याही तैलचित्राचा समावेश करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.