ऐकावे ते नवलचं ….. दोन हजाराच्या नोटेवर लग्नपत्रिका !

लग्न पत्रिकांचे वेगवेगळे स्वरूप आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते. लग्न पत्रिकेसाठी विशिष्ट कागदाचा वापर तर कधीकधी कापडावर छापलेली पत्रिका दिसते. यंदा मात्र दोन हजार रुपयाच्या नकली नोटेवर लग्नपत्रिका छापण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

नोटबंदीनंतर नवीन दोन हजारांची गुलाबी रंगाची नोट चलनात आली. या गुलाबी रंगाच्या दोन हजाराच्या नकली नोटेवर यंदा लग्नपत्रिका छापलेल्या नोटा घरी येत आहेत. पूर्वी लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच समजूत काढण्यासाठी वापरात येणाऱ्या खोट्या नोटा पाहायला मिळायच्या. आता ‘रिजर्व्ह बँक ऑफ लव्ह’ अशा नावाची नोट चर्चेत आहे. या नोटेवर गांधीजींच्या जागी वधु-वर तर बाजूला गणपती तर काही नोटेवर अन्य देवता पाहायला मिळतात. किमतीच्या जागी लग्नाची तारीख असून मागील बाजूस पत्रिकेप्रमाणे सर्व माहिती दिलेली आहे. ही नोटेवरील लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.