औद्योगिक परिसरात कचरा पेटविल्याने वायू प्रदूषणात वाढ

पिंपरी: पोलीसनामा ऑनलाइन

पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील पेठ क्रमांक १० येथील अग्नी शमन केंद्राच्या  राखीव जागेवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने चालू केलेल्या कचरा वर्गीकरण केंद्रामध्ये कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे या परिसरातील कंपनी मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे आरोग्य धोक्यात आले असुन धुरामुळे कामगार वर्गाला श्वसनाचे अनेक आजार होत आहे.

पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना कचरा वर्गीकरण केंद्र चालू केल्या पासून त्यास विरोध करत असून अनेक वेळा आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. मात्र कचरा जाळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे कोरडे आश्वासन मिळाले मात्र ना कचरा वर्गीकरण केंद्र  दुसरीकडे  हलवले जात आहे ना कचरा जाळणाऱ्यावर कारवाई केली जात आहे .अंधेर नगरी चौपट राजा प्रमाणे औद्योगिक परिसरात मुलभूत सुविधा बाबत अक्षम्य हेडसळ चालू असून गेले ८ दिवसात रोज येथे कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत असून येथील उद्योजक या परिस्थितीला वैतागले आहेत.

या बाबत बोलताना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले की, कचरा वर्गीकरण केंद्र दुसरी कडे हलवण्या बाबत व  कचरा जाळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी ५ महिन्यापूर्वी आमदार महेशदादा लांडगे यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये दिले होते. ते अद्याप पूर्ण झालेले नाही, येत्या महिना भरात कचरा वर्गीकरण केंद्र दुसरीकडे हलवण्याबाबत निर्णय न घेतल्यास संघटने तर्फे तीव्र आंदोलन केले जाईल