औरंगाबाद महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची उचलबांगडी

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईन

आैरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न प्रकरणी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर आज शहराचे महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची अचानक उचलबांगडी करण्यात आली आहे. शहराचा कचरा प्रश्न यादव यांच्यानंतर मुगळीकर यांना भोवल्याची शक्यता आहे. मनपा आयुक्त डी.एम .मुगळीकर यांची वैधानिक विकास महामंडळात बदली करण्यात आली असून ,जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पालिकेचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.