खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यालयासमोर भिडे आणि एकबोटेंच्या अटक मागणीसाठी धरणे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
कोरेगाव भीमा येथे दंगल घडून एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर न्यायालयाने अटक वॉरंट अधून देखील मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेना अटक होत नाही. ही निषेधार्थ बाब असून त्यावर भाजप या आरोपीना पाठीशी घालत आहे,असे आरोप संविधान संरक्षण समिती मार्फत करण्यात आला आहे. आज पुण्यात खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यालयाच्या समोर संविधान समितीने धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
यावेळी संविधान संरक्षण समितीचे समन्वयक संजय भिमाले म्हणाले की,”भीमा कोरेगाव घटनेला आता महिना उलटून गेला आहे. मात्र यावर भाजपकडून कोणत्याही प्रकारची भूमिका जाहीर करीत नाही.तर पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे हे देखील काही बोलण्यास तयार नाही.तर खासदार साहेब काही तरी बोला. अशी मागणी देखील त्यांनी केली.
तर ते पुढे म्हणाले की,या प्रकरणातील आरोपीना अटक होत नाही. ही शोकांतिका असून त्यांना अटक होण्याची गरज असून जोवर अटक होत नाही.तोवर आमचा लढा कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.