गुगल कडून डूडलद्वारे चिपको आंदोलनाच्या आठवणींना उजाळा

मुंबई : वृत्तसंस्था
चिपको आंदोलनाला आज 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने गुगलने डूडलच्या माध्यमातून चिपको आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आंदोलनाची सुरुवात 1970 च्या दशकात झाली होती. आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंसा आणि उपद्रवाशिवाय ते केले होते. वृक्षतोडीविरोधात अतिशय शांततेत हे आंदोलन केले होते.

जंगलातील वृक्षतोडीविरोधात हे आंदोलन झाले होते. वृक्ष वाचवण्यासाठी आंदोलक झाडांना मिठी मारत असत. त्यामुळे याला ‘चिपको आंदोलन’ हे नाव पडले. 1974 मध्ये सुरु झालेल्या या आंदोलनाच्या जनक गौरी देवी होत्या. त्यांना ‘चिपको वुमन’ नावानेही ओळखले जाते. जोधपुरच्या महाराजांनी वृक्षतोडीचे आदेश दिले होते. पण त्यावेळी बिष्णोई समाजाच्या महिलांनी झाडांना मिठी मारुन वृक्षतोडीला विरोध केला होता. या आंदोलनात बिष्णोई समाजाचे योगदान महत्त्वाचे होते.

अलकनंदा खोऱ्याच्या मंडल गावात एप्रिल 1973 मध्ये सुरु झालेले हे आंदोलन हळूहळू संपूर्ण उत्तर प्रदेश आणि हिमालयातही पसरले होते. त्याचाच गौरव म्हणून आज गुगलने आपले डूडल चिपको आंदोलनाच्या चित्राने रंगवले आहे.